भंडारा: मेंदूज्वर आजाराने (Meningitis) 7 वर्षीय बलिकेचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील लाखोरी (BHandara Lakhori) येथे घडली आहे. मेंदूज्वर आजाराने मृत झालेल्या बालिकेचे नाव नुवांशी विलास उरकुडे (Nuvanshi Vilas Urkude) असून ती जिल्हा परिषदेच्या शाळेत दुसरीमध्ये शिकत होती. गेल्या चार ते पाच दिवसांपासून नुवांशीला ताप आला होता. त्यानंतर तिच्या गावातीलच आरोग्य उपकेंद्रात तिच्यावर उपचार करण्यात आला होता, मात्र ताप कमी होत नसल्याने ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे हलविण्यात आले. लाखनी येथेही तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते, मात्र त्यानंतरही तिच्या तब्बेतीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नसल्याने तिला भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयमध्ये हलवण्यात आले.
भंडारा येथे हलविण्यात आले मात्र नुवांशी हिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला डॉक्टरांनी तपासल्यानंतर नागपूर येथे हलविण्यास सांगण्यात आले, मात्र नागपुरमध्ये उपचारादरम्यान नागपूर येथील धंतोली खासगी रुग्णालयात नुवांशी हिचे निधन झाले.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात डासांचे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान नुवांशी या अशा आजारी मृत्युने परिसरात भीतीचे वातावरण पसरले, असून नुवंशीच्या मृत्यू मेंदूज्वराने झाले असल्याचे बोलले जात आहे, तिच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील लाखोरी येथील बालिकाचे मेंदुज्वराने निधन झाल्याने आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. डासांचे प्रमाण वाढले असल्याने आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. शाळेत शिकणाऱ्या मुलीचा मेंदुज्वराने निधन झाल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. परिसरात डासांचे प्रमाण वाढले असल्याने ताप आणि इतर रोगांचा फैलाव होऊ नये यासाठी औषध फवारणी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.