भंडारा : बियाणांचा विशिष्ट कालावधी असतो. काही धानाचे बियाणे 90 दिवसात निघतात. तर काही बियाणे 150 दिवसांत निघतात. शेतात किती पाणी उपलब्ध आहे. त्यावरून शेतकरी धानाच्या बियाणांची निवड करतात. पण, भंडाऱ्यात एका कपंनीने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली. बियाणे निघण्यास 145 दिवस लागतील. असे सांगितले. पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले. पण, हे बियाणे फक्त 90 दिवसात आले. शेतात पाणी असल्यानं उत्पन्न निघाले नाही. अशाप्रकारे बऱ्याच शेतकऱ्यांची फसवणूक (Fraud) झाली. शेकडो शेतकऱ्यांनी यासंदर्भात कृषी विभागाकडं तक्रारी (Complaints) केल्या. पण, अद्याप कारवाई झाली नसल्यानं शेतकरी संभ्रमात आहेत. मागील वर्षी भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दफ्तरी बियाणे कंपनीने (Seed Company) फसवणूक केली. 145 दिवसात निघणारी दफ्तरी कंपनीचं 1008 धानाचे वाणाची बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केली. 90 दिवसांत पीक आल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली. या घटनेला एक वर्ष लोटूनही कृषी विभागाद्वारे अद्याप कोणतीही कारवाही केली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी कृषी विभागा प्रती आपला संताप व्यक्त करत आहेत. कृषी विभागाविरोधात आंदोलनाच्या पवित्रात आहे.
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक बियाणे कंपंनीने केली. मागील वर्षी मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी दफ्तरी कंपनीची 145 दिवसांच्या कालावधीत निघणाऱ्या 1008 वाणाच्या बियाणाची खरेदी केली. शेतात पेरणी सुद्धा केली. मात्र ते बियाणे 90 दिवसात पीक निघाले. तोही अर्धवट. त्यामुळे दफ्तरी कंपनीने आपली फसवणूक केली असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनात आले. ज्या शेतीमध्ये मुबलक पाणी साठवून राहतो त्या शेतात जास्त कालावधीत निघणारा पीक लागवट केली जाते. मात्र आता हा पीक लवकर आल्याने शेतकऱ्यांनी धानाची कापणीही करू शकत नाही. आता ही तर परिस्थिती एकट्या गावाची नसून संपूर्ण तालुक्यात हीच परिस्थिती होती. शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार दिली.
या प्रकरणात कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. दफ्तारी कंपनी विरोधात कारवाहीचे आश्वासन दिले. मात्र आता या प्रकरणाला एक वर्ष लोटला. अद्याप कारवाही करण्यात आली नाही. असे शेतकरी अशोक पाटील, नितीन लिल्हारे यांचे म्हणणे आहे. याबाबत कृषी अधिकारी अरुण बलसाने यांनी आम्ही तसा अहवाल पाठविला आहे. वरिष्ठ स्तरावरून अहवाल येताच कारवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे नुकसानीच्या अहवाल आणि कारवाईला अजून किती वेळ लागतो हे बघणे महत्वाचे ठरेल.