मी माझा भाऊ यांच्या भेटीला आली, सुषमा अंधारे यांची शिंदे गटातील या नेत्यावर तिखट प्रतिक्रिया

| Updated on: Dec 02, 2022 | 5:15 PM

सुषमा अंधारेमुळे शिवसेना वाढणार आहे, याची भीती त्यांना असल्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे.

मी माझा भाऊ यांच्या भेटीला आली, सुषमा अंधारे यांची शिंदे गटातील या नेत्यावर तिखट प्रतिक्रिया
सुषमा अंधारे
Follow us on

गोंदिया – मी माझा भाऊ नरेंद्र भोंडेकर यांच्या भेटीला आली, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी भोंडेकरांवर पलटवार करताना दिली आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी सुषमा अंधारे यांना भंडाऱ्यातून निवडणूक लढण्याचे आवाहन केले होते. त्यांच्यावर पलटवार करताना सुषमा अंधारे यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेबद्दल विचारले असता आम्ही सुद्धा आमचा पक्ष मजबूत करण्यासाठी आलेलो आहोत. शिवसेना थकलेली नाही. नव्या उमेदीने लढणार हे दाखविण्यासाठी मी आलेली आहे, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे. चार-दोन आमदार हलले म्हणजे शिवसेना संपली असे होत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे मुख्य बेस हे त्यांचे वोटर आहेत. ते अजूनही शिवसेनेसोबत असल्याचे सांगितले आहे. त्यांना नवीन ताकद आणि उमेद देण्याकरिता आल्याचे त्यांनी सांगितलं.

सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात महिला शिवसेना फुटणार, या मनसे नेते प्रकाश महाजन यांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. प्रकाश महाजनांनी पेढे वाटावे असा सल्ला त्यांनी महाजन यांना दिला आहे. महाजन कुटुंब पर्यायाने भाजप शिवसेना संपविण्यासाठी करत असलेले प्रयत्न त्यातून हे वाक्य असल्याचे ते बोलले.

सुषमा अंधारेमुळे शिवसेना वाढणार आहे, याची भीती त्यांना असल्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे. मी जे बोलतोय ते परफेक्ट ठिकाणी जात असल्यामुळे माझ्यावर टीका होत आहे असेही त्या म्हणाल्या.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महिला मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय क्रांतीकारक असल्याचा वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले. त्या गोंदियात बोलत होत्या. मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहे, असे वक्तव्य करणे केवळ कंड्या पिकवण्याचे काम असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेत माझ्यापेक्षाही ज्येष्ठ नेत्या असल्याचे त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे.