विदर्भातील माजी आमदार या पक्षाच्या संपर्कात; चरण वाघमारे म्हणतात, जो पक्ष…

| Updated on: Mar 26, 2023 | 3:13 PM

तेलंगणातील विकास पाहून जनता प्रभावित झाली आहे. त्यामुळे काही माजी आमदार चंद्रशेखर राव यांच्या संपर्कात आहेत. हर्षवर्धन जाधव यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला.

विदर्भातील माजी आमदार या पक्षाच्या संपर्कात; चरण वाघमारे म्हणतात, जो पक्ष...
Follow us on

भंडारा : तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात एंट्री केली. नांदेडमध्ये त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सज्ज झाले आहेत. विदर्भातील काही आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. चंद्रशेखर राव यांची भुरळ विदर्भात पडताना दिसत आहे. माजी आमदार चरण वाघमारे म्हणाले, चंद्रशेखर राव यांनी नांदेडला सभा घेतली तेव्हा त्यांनी तेलंगणात शेतकऱ्यांचा विकास कसा झाला त्यांच्या योजना कशापद्धतीने राबवल्या गेल्या. हे त्यांनी नांदेडच्या सभेत सांगितलं. त्यानंतर राज्यातील काही माजी आमदार त्यांच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. मीसुद्धा त्यांच्याशी भेटून प्रभावित झालो आहे.

तेलंगणातील विकास पाहून जनता प्रभावित झाली आहे. त्यामुळे काही माजी आमदार चंद्रशेखर राव यांच्या संपर्कात आहेत. हर्षवर्धन जाधव यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. जाधव हे भाजपच्या एका मोठ्या नेत्याचे जावई आहेत. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात बीआरएसला प्रतिसाद मिळत आहे. विदर्भातही तशी परिस्थिती निर्माण होईल, असंही चरण वाघमारे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

त्यांच्यासोबत जाण्यास काही हरकत नाही

महागाईच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. निघणारे पीक परवडणारे नाही. त्यामुळे काही माजी आमदार बीआरएसच्या संपर्कात आहेत. तसाही मी स्वतंत्र आहे. त्यामुळे जो शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील त्यांच्यासोबत जाण्यास काहीच हरकत नाही, असंही चरण वाघमारे यांनी सांगितलं.

तेलंगणासारख्या योजना महाराष्ट्र राज्यात का राबवल्या जात नाही, असा प्रश्न माझ्याही मनात येतो. तेलंगणातील शेतकऱ्यांचा विकास कसा झाला, हे या राज्यातील लोकांना सांगणं काही चुकीचं आहे, असं मला वाटत नाही. महाराष्ट्रात भारत राज्य समिती म्हणजे बीआरएसला प्रतिसाद मिळत आहे.

तेलंगणा सरकार घेते शेतकरी हिताचे निर्णय

चंद्रशेखर राव यांच्या पक्षाची विदर्भात इंट्री विदर्भातील अनेक माजी आमदार यांना बीआरएसपी पक्षाची भुरळ पडली. तुमसर -मोहाडी विधानसभा क्षेत्राचे भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे बीआरएसपी पक्षाच्या संपर्कात आहेत. विदर्भातील अनेक माजी आमदारांचा गट भारतीय राष्ट्रीय समिती पक्षचा (बीआरएसपी) संपर्कात आहेत. शेतकरी हिताचे निर्णय तेलंगणाची सरकार घेते. त्यामुळे सामान्य माणसाचा कसा विकास साधता येईल, यासाठी विदर्भातील माजी आमदारांचा गट तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या संपर्कात असल्याचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी वक्तव्य केले.