भंडारा : भरधाव मालवाहतूक गाडीने उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला (Travels) मागून जोरदार धडक दिली. भंडारा-तुमसर महामार्गावरील मोहाडी (Mohadi ) तालुक्यातील कुशारी फाट्याजवळ ( Kushari Fata) ही घटना घडली. यात मालवाहतूक गाडी अक्षरशः चक्काचूर झाली. अपघात लक्षात घेता नशीब बलवत्तर म्हणून कोणतेही जीवितहानी झाली नाही. मात्र यात गाडीमालकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, झालेल्या अपघातानंतर वाहतूक खोळंबली होती. या ट्रॅव्हल्समध्ये फक्त आठ जण प्रवास करत होते. त्यापैकी तीन जण गंभीर जखमी आहेत. ट्रॅव्हल्स भंडाऱ्यावरून बालाघाटला जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी फक्त आठ होते. त्यापैकी तीन गंभीर जखमी झाले. भाजीपाल्याची मालवाहतुकीची गाडी भंडाऱ्यावरून तुमसरला जात होती. नरेंद्र ट्रॅव्हल्स ही नेहमी भंडारा-बालाघाट प्रवास करते. या बसमध्ये बहुतेक भंडाऱ्याला कामानिमित्त येणारे लोकं प्रवास करतात.
मोहाडीवरून कुशारीला जाताना एक फाटा फुटतो. या रस्त्यावर नेहमी अपघात होतात. इथून चार बाजूला चार रस्ते जातात. त्यामुळं अपघाताची शक्यता जास्त असते. त्यामुळंच या रस्त्यावरब्रेकर्स लावले आहेत. तरीही भाजीपाल्याची मालवाहतूक करणारा हा घाईत होता. अतिघाई त्याला भोवली. समोर ट्रॅव्हल्स अचानक थांबली. त्यामुळं मालवाहतूक करणाऱ्याच्या चालकानं करकचून ब्रेक दाबला. तरीही गाडीवर नियंत्रण मिळविता आले नाही. कारण गाडीचा वेग जास्त होता. गाडी ही ट्रॅव्हल्सवर धडकली. यात ट्रॅव्हल्समधील प्रवासी जखमी झाले. शिवाय मालवाहतूक करणारी गाडी समोरून पूर्ण बेंड झाली. या गाडीचे नुकसान झाले.
याच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक होते. त्यामुळं रस्त्याची चाळण झाली आहे. कितीही वेळा रस्ता दुरुस्त केला. तरी रेतीचे वजनी ट्रॅक रस्त्याची चाळण करून ठेवतात. त्यामुळंही या रस्त्यावर अपघात होत असतात. यापूर्वीही येथे काही अपघात झालेले आहेत. ट्रॅव्हल्स आणि मालवाहतूक गाडीच्या अपघातामुळं काही काळ वाहतूक खोळंबली होती. दोन्ही बाजूला गाड्यांची रांग लागली होती. पोलिसांनी रस्ता वाहतूक सुरळीत केली. येथून हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे आहे. त्यांच्या डोळ्यासमोरच अवैध वाहतूक सुरू असते. पण, ते नियंत्रणात आणणे पोलिसांना कठीण आहे. त्यामुळंच येथे अपघात होत असतात.