मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. प्रवीण दरेकारांना आता पोलिसांनी नोटीस (Police Notice) बजावली आहे. तसेच उद्या चौकशीला हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे. याबाबत दरेकरांना विचारले असता, त्यांनी नोटीस मिळाल्याची माहिती दिली आहे. तसेच मी चौकशीला हजर राहणार आहे. आणि सर्व माहिती देणार आहे. पोलिसांना (Mumbai police) पूर्ण सहकार्य करणार आहे. कर नाही तर डर कशाला, अशी भूमिका आता प्रवीण दरेकांनी घेतली आहे. तसेच नोदीस द्यावी हा आमचाच अग्रह होता. विना नोटीस देता कारवाई कशी सुरू केली, असा सवाल आम्ही केलेला असेही दरेकर म्हणाले आहेत. आम्ही कायद्याला माननारे लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी होती. आम्ही कोर्टात गेल्यानंतर त्यांना नोटीस देण्याशिवाय पर्याय नव्हता, असे दरेकर म्हणाले आहेत.
सरकारच्या दबावाखाली भाजपच्या नेत्याला त्रास देण्यासाठी हा कट रचल आहे. त्यामुळे मी जाऊन पळवाट न काढता याला सामोरे जाणार आहे. मुंबै बँक प्रकरणात दरेकरांना ही नोटीस मिळाली आहे. त्यामुळे आता पुन्हा दरेकरांच्या चौकशीवरून राजकारण तापलं आहे. तसेच युवासेनेच्या आंदोलनावरही दरेकरांनी निशाणा साधला आहे. आपल्या अडीच वर्षाच्या कारभार झाकण्यासाठी आणि लोक महाविकस आघाडीच्या कारभारवर प्रक्षुब्ध आहेत. त्यामुळे आपल्या अपयशाचा फोकस दुसरीकडे वळवणयासाठी अशी आंदोलन केली जात आहेत. इतर राज्य मध्ये वॅट आणि सेस कमी केले. पण महाविकास आघाड ने किती सेस कमी केला ते आधी सांगावं, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
शनिवारच्या राज ठाकरेंच्या भाषणावर आणि विरोधकांच्या टीकेवरही त्यांनी भाष्य केलं आहे. भाजपची स्क्रीप्ट होती हे महण्यापेक्षा राज साहेब ठाकरे यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्यावर कुणीच बोलत नाही. बाळासाहेबांनी जे मुद्दे आयुष्यभर मांडले तेच मुद्दे राज साहेब ठाकरेंनी मांडले. मशीदच्या भोंग्याच्या बाबतीत बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते त्यावर निर्णय घेऊ शकतात का? राजसाहेबजे भूमिका मांडत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीचा पर्दाफाश होणार, त्या भूमिकेतूनच आज टिका केल्या जात आहेत. राज ठाकरेंनी दुखत्या नसवर बोट ठेवल्या मुळे आज ते चलबिचल झाले आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल बोलताना, राजकारणात त्या त्या वेळेला भूमिका बदलत असतात. पण नंतर जर सकारात्मक बदल होत असेल तर ते स्वागतार्ह आहे. अनेक मोठ्या नेत्यांनी चाळीस वर्षात काय भूमिका घेतल्या त्या माहीत आहेत, असे म्हणत त्यांनी पवारांना टोला लगवाला आहे.
उलवे येथील भूखंड तिरुपती देवस्थानाला मंदिरासाठी देण्याचा प्रस्ताव सिडको राज्य शासनाला पाठवणार