तेजस मोहतुरे, प्रतिनिधी, भंडारा : घरात जुन्या वस्तू असतात. पण, त्या निरुपयोगी असतात. मग त्या इलेक्ट्रिक वस्तू, पुस्तकं किंवा कपडे असू शकतात. अशा वस्तू कपाटात पडून असतात. अशावेळी त्या कुणालातरी दान केल्यास त्यातून ते टाकाऊतून टिकावू वस्तू तयार करू शकतात. अशी ही संकल्पना आहे. या संकल्पनेचा वापर तुमसर नगर परिषदेमध्ये केला जात आहे. आरआरआर म्हणजे काय हे समजून घेऊया.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगर परिषदेने अनोखा उपक्रम सुरु केला आहे. तुमच्या घरी वापरत नसलेली साहित्य, वस्तू, पुस्तकं, कपडे इत्यादी फेकण्यायेवजी नगर परिषदेने उघडलेल्या RRR सेंटरला दान करण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर (माझे जीवन, माझे स्वच्छ शहर) हे अभियान तीन आठवड्यांच्या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेतला. या अभियानाअंतर्गत नगर परिषद कार्यालय तुमसर येथे रिड्यूस, रियुज आणि रिसायकल सेंटर म्हणजेच RRR केंद्राचे उभारणी करण्यात आली आहे.
तुमसर शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. अनेक वस्तूंची आपल्याला गरज नसते. म्हणून आपण तीच वस्तू फेकून देतो किव्हा भंगारात विकतो. पण तीच वस्तू तुम्ही दान केली तर एखाद्या उपयोगी पडून शकते.
वापरलेली जुनी पुस्तके, इलेक्ट्रॉनिक वस्तू कपडे, पादत्राणे आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यांचा पुनर्वापर करण्यासाठी रिड्यूस, रियुज आणि रिसायकल सेंटर म्हणजेच RRR सेंटर येथे आपल्या घरातील वापरात नसलेल्या सुस्थितीतील वस्तू RRR सेंटरमध्ये जमा करावे. गरजवंतांना मदत करावी. जेणेकरून संकलित कलेल्या वस्तू नूतनीकरण, पुनर्वापर किंवा नवीन उत्पादन तयार करण्यात येईल. असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम आणि मनोज उकरे यांनी केले.
#Reduce – कचरा कमी करणे
#Reuse – कचरा पुन्हा वापरणे
#Recycle – कचरा पुनर्चक्रन करणे