भंडारा : वातावरणातील बदलाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागात (Rural Area) पहायला मिळत असून सर्दी, खोकला, डोकेदुखी, तापाचे रुग्ण वाढत असल्याने भंडारा (bhandara) जिल्हातील ग्रामीण भागातील रुग्णालय फुल्ल झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी (Doctor) दिला आहे. मागच्या काही दिवसांपासून वातावरणात चांगलाचं बदल झाला आहे. अचानक वातावरणात तापमान वाढल्यामुळे संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर मागच्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे.
भंडारा जिल्ह्यात सद्धा उन्हं पावसाचा व ढगाळ वातावरणाचा खेळ सुरु आहे. अचानक होत असलेल्या वातावरणीय बदलामुळे विषाणुजन्य रोगांची वाढ होत आहे. काहीवेळा सर्दी, खोकला, फ्लू विषाणूजन्य नसून जीवाणूंमुळे होतात. अशा वेळेस ताप येणे, कान फुटणे, छातीत कफ होऊन न्यूमोनिया होणे अशा समस्या उद्भवतात. त्यासाठी वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिजैविके घ्यावी लागतात. त्याचसोबत वेळीच निदान, औषधे, वाफ आदी उपचार आजाराच्या सुरुवातीलाच केले. नंतरची गुंतागुंत टाळता येते. मागील तीन-चार अचानक वातावरणात बदल झाल्याने दमट तर कधी थंड वातावरणाचा बदलामुळे रुग्णाची संख्या वाढत असल्याचे चित्र डॉक्टर सांगत आहेत. त्यामुळे वेळीच सल्ला घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. अचानक झालेल्या बदलामुळे वातावरण बदलून गेलं आहे. त्याचा फटका लोकांना बदला आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात सु्द्धा संसर्गजन्य आजाराचं प्रमाण अधिक वाढलं आहे. त्यामुळे प्रशासनाने आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर शक्य असल्यास मास्क वापरावे असं जाहीर करण्यात आलं आहे.