भंडारा – रशिया युक्रेनमध्ये (Russia Ukraine) युद्ध सुरू झाल्यापासून त्याचे परिणाम आता दिसायला सुरू झाले आहेत. देशात अनेक गोष्टीचे दर वाढले आहेत. त्यामध्ये तेलाचा देखील समावेश आहे. त्यामुळे भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील अनेकांनी पुन्हा करडई तेलाला पसंती दर्शवली आहे. रशिया यूक्रेन यूद्धामुळे सूर्यफुल,फल्ली व सोयाबीन तेलाचे भाव वाढले आहेत. भंडारा जिल्ह्यातील सामान्य लोकांनी पुन्हा एकदा करडई तेल वापरण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे भविष्यात करडई तेल इतर तेलांना उत्तम पर्याय असेल. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी (Bhandara Farmer) करडईची लागवड मोठ्या प्रमाणात घ्यायला सुरूवात केली आहे. भंडारा जिल्ह्यात करडई तेलाचा वापर वाढला आहे. इतर तेलाच्या तुलनेत करडईचे तेल स्वस्त आहे. भविष्यात करडई तेल इतर तेलांच्या तुलनेत उत्तम पर्याय असेल. भविष्याचा वेध घेतं जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी करडईची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.
देशात सोयाबीन व सूर्यफुलाचे खाद्यतेल रशिया येथून आयात होते
भारतीय संस्कृतीत खानपानात तेल व मसाल्यांचा सर्वाधिक वापर केला जातो. प्रत्येक पदार्थासाठी तेल मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तेलाशिवाय येथील भाज्या व अन्य पदार्थ बनत नाहीत. हेच कारण आहे की त्यांमुळे देशाततेलाची मागणी वाढत जात आहे. त्यांमुळे देशा व्यतिरिक्त विदेशातून ही तेलाची आयात करावी लागत आहे. विशेष म्हणजे, देशात सोयाबीन व सूर्यफुलाचे खाद्यतेल रशिया येथून आयात होते. सध्या तेथील परिस्थितीनूसार तेलांचे दर वाढले असून अजून वाढण्याची शक्यता आहे. आपल्या देशात तसे दर ठरवून त्यांची विक्री केली जाते. मध्यंतरी परिस्थिती सुरळीत असल्याने खाद्यतेलांचे दर काही प्रमाणात कमी झाले होते. मात्र आता रशिया व युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले असून त्याचे परिणाम खाद्यतेलांच्या दरावर पडताना दिसत आहे.
देशात खाद्य तेलाच्या भावात वाढ झाली आहे
युद्धामुळे रशियातील वितरण व्यवस्था विस्कटली आहे. त्याचा परिणाम म्हणून परिणामी तेलाचा पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा बंद झाला आहे. यामुळे देशात खाद्य तेलाच्या भावात वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्यात त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. जिल्ह्यात पाम तेलात 20 रूपयांची, सूर्यफुल तेलात 25 रूपयांची, सोयबिन तेलात 20 रूपयांची शेंगदाना तेलात 15 रूपयांची वाढ झाली आहे. ह्यावर पर्याय शोधात आता जिल्ह्यात करडई च्यां तेलाची मागणी वाढली आहे. त्यामुळे भविष्यात करडई तेल उत्तम पर्याय असणार आहे अशी माहिती शिवम कैकाडे (तेल व्यापारी) यांनी सांगितली.
धान उत्पादन शेतकरी सध्दा करडई लागवड़ीकड़े वळला
तेल हे आवश्यक वस्तु झाल्याने तेलाची मागणी वाढली आहे. मात्र वाढते भाव लक्षात घेता करडई हे उत्तम पर्याय ठरणार आहे. भविष्याचा विचार करता, भंडारा जिल्ह्यात करंडई उत्पादन वाढले आहे. आता धान उत्पादन शेतकरी सध्दा करडई लागवड़ीकड़े वळला आहे अशी माहिती सुखदेव लांजेवार शेतकऱ्याने सांगितली. अजून ही रशिया यूक्रेन यूद्धाचा निकाल लागेल असे दिसत नाही. परिस्थिती अशीच राहिली तर अजून तेलाचे भाव वधारनार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणुन भविष्यात करडई तेलाशिवाय पर्याय राहणार नाही.