भंडारा : नैराश्यातून घर सोडून गेलेल्या व्यक्तीचे अखेर दोन दिवसानंतर वैनगंगा नदीत मृतदेह (Deadbody) मिळाल्याची घटना भंडारा शहरात घडली आहे. नरेश मखीजा (42) असे मयत इसमाचे नाव आहे. मखीजा याने आत्महत्या (Suicide) केल्याची प्राथमिक माहिती आहे. वैनगंगा नदीवरील कारधा छोट्या पुलाजवळ एक मृतदेह तरंगताना दिसल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढत उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. पोलिस नरेश यांच्या मृत्यूबाबत अधिक तपास करीत आहेत. (The body of a man who left home in despair was found in Wainganga river)
नरेश सिंधी कॉलनी येथे राहतात. गेल्या दोन दिवसापासून ते घरी आले नव्हते. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. मात्र नरेश काहीत पत्ता लागत नव्हता. अखेर कुटुंबीयांनी भंडारा शहर पोलिसात नरेश बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर सोमवारी सकाळी वैनगंगा नदीवरील कारधा पुलाजवळ एक मृतदेह तरंगताना आढळला. ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना याची महिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. प्राथमिकदृष्टया नरेश यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिस सखोल तपास करीत आहेत.
अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा (विठोबा) येथे यात्रेत आलेल्या एका 23 वर्षीय युवकाचा मालखेड तलावाच्या पाण्यात आंघोळ करताना बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. हितेंद्र गजानन भारती असे मयत तरुणाचे नाव आहे. दुपारी शोध व बचाव पथकाने पाण्यातून मृतदेह शोधून बाहेर काढला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ठाणेदार मगन मेहते हे घटनास्थळी दाखल झाले. श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथे गुढीपाडवा महोत्सव पार पडला. या महोत्सवानिमित्य यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव तालुक्यातील खर्डा गवंडी येथील हितेंद्र भारती आला होता. सावंगा विठोबा गावात असलेल्या मालखेड तलावात तो सकाळी आंघोळीकरीता गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावात बुडाला. (The body of a man who left home in despair was found in Wainganga river)
इतर बातम्या
Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख रुग्णालयात, खांद्याच्या शस्त्रक्रियेसाठी अॅडमिट