भंडारा : वैनगंगा नदी तशी जीवनदायीनी पण केव्हा कोपेल काही सांगता येत नाही. गोसेखुर्द धरण झाल्यामुळं बॅकवॉटर 20 ते 25 किलोमीटरपर्यंत आहे. कामानिमित्त लोकांना एका बाजूनं दुसऱ्या बाजूला जावं लागते. अशावेळी नावेचा उपयोग करतात. काल कृष्ण जन्माष्ठनिमित्त कहय्याचं विसर्जन सुरू होते. नदी गावालगत असल्यानं लोक विसर्जन करायला गेले. नावेत सहा जण बसले होते. या कहैय्या (kahaiyya) विसर्जन करून आले. नाव किनारी पोहचली असं त्यांना वाटलं. पाय टेकले. पाहतात तर काय ते बुडायला लागले. बाजूची नाव लगेच मदतीला धावली. पोहणाऱ्यांनी नदीत सूर धरला. बुडताणाऱ्यांना लगेच नावेचा आधार देऊन बाहेर काढण्यात आले. त्यामुळं सहा जणांचे प्राण वाचले (saved life). ही घटना खमारी (khamari buti) येथे घडली.
भंडाऱ्यातील वैनगंगा नदीत सहा जण बुडाले pic.twitter.com/tR3JE66grm
हे सुद्धा वाचा— Govind Hatwar (@GovindHatwar) August 20, 2022
एका बाजूनं दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी नावेचा उपयोग केला होता. काल कहैय्या विसर्जन होतं. विसर्जनासाठी सहा जण नावेत बसले. विसर्जन करून परत येत होते. तेवढ्यात तोल गेला. नावेतून सहाही जण खाली पडले. गटांगळ्या खाऊ लागले. किनाऱ्यावर काही लोकं होते. पट्टीचे पोहणारे लगेत नदीत उतरले. दुसऱ्या नावाड्यानं नाव त्यांच्या मदतीला नेली. त्यामुळं ते सुखरुप बाहेर पडले. पण, हा थरार काहींना कॅमेऱ्यात कैद केला. या प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खमारी बुटी याच भागात 2009 मध्ये मोठी दुर्घटना घडली होती. रोवणीसाठी 34 महिला नदी ओलांडून गेल्या होत्या. तेव्हा नदीला पूर नव्हता. पण, क्षमतेपेक्षा जास्त जण बसले असल्यानं नाव बुडाली. महिला गटांगळ्या खाऊ लागल्या. ज्या ठिकाणी नाव बुडाली तिथं मोठा खड्डा होता. त्यात बुडून 34 महिलांचा बळी गेला होता. ही घटना 13 वर्षांपूर्वीची असली तरी त्या घटनेची आठवण आज झाली. कारण त्यावेळी 34 महिलांचा बळी गेला होता. ही घटनासुद्धा याच भागात घडली होती.