बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. याप्रकरणी राजकीय नेत्यांकडून पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बदलापुरात आज इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. बदलापूर येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी अनेक पक्षांकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, त्याच्या निषेधार्थ आरक्षण बचाव संघर्ष समितीने आज भारत बंदची घोषणा केली आहे. तसेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लांबणीवर पडल्या असल्या तरी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांकडून मतदारसंघ, उमेदवार याबद्दल चाचपणी सुरु आहे.
पुण्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलदास बांदल यांना 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. यु कदम यांनी ईडी कोठडी ठोठावली. बांदलतर्फे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा तर ईडी तर्फे सुनील गोन्साल्विस यांनी युक्तिवाद केला. शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी मंगलदास बांदल यांना अटक झालीय. त्यांना पुण्यावरून अटक करण्यात आली. बांदल यांच्या घरावर ईडीच्या धाडी सुरू होत्या. धाडीत कोट्यावधी रुपयांची रोकड सापडल्याची माहिती आहे. आज बांदल यांना मुंबई सत्र न्यायालयात विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींच्या निर्दोश मुक्ततेला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. सीबीआयला हायकोर्टाकडून उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची सुनावणी 23 ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. डॉ. वीरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावेला पुणे सत्र न्यायालयानं पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केलं आहे. पुणे सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात मुक्ता दाभोलकर यांची हायकोर्टात याचिका दाखल केला आहे. डॉ. दाभोलकरांची हत्या पूर्वनियोजित होती, मारेकरी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी इतर आरोपींनीच मदत केल्याचा याचिकेतून दावा आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी आजपासून जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरक्षेसह काँग्रेस पक्षाकडून तयारी पूर्ण झाली आहे. विधानसभा निवडणुकीबाबत बोलायचे झाले तर काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी ही निवडणूक एकत्र लढू शकतात, अशी चर्चा आहे.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी झारखंडचे निवडणूक प्रभारी शिवराज सिंह चौहान आणि सहप्रभारी हिमंता बिस्वा सरमा यांची भेट घेतली आहे. या भेटीत जेपी नड्डा यांनी चंपाई सोरेन आणि झारखंड निवडणुकीवर चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.
कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या विरोधात कोलकाता येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
महाराष्ट्रातील बदलापूर घटनेबाबत महाविकास आघाडी आक्रमक होताना दिसत आहे. 24 ऑगस्टला विरोधकांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. मविआच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
24 August
Maharashtra bandh!
महाराष्ट्र बंद!!!
महाविकासआघाडीचे ठरले. pic.twitter.com/tC8GVVgCIH— Sanjay Raut (@rautsanjay61) August 21, 2024
कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणावर शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, देशात इतरही घटना घडल्या आहेत. परंतु ही घटना अधिक ठळक केल्या जात आहेत. गेल्या 8-10 दिवसांपासून चॅनल्स ही बातमी दाखवत आहेत, याचे कारण बंगालमध्ये टीएमसीचे सरकार आहे ? पंजाबशीही संबंध प्रस्थापित होत आहेत. विरोधी मुख्यमंत्री तुरुंगात राहतील, पण तेच लोक सरकारमध्ये सहभागी झाले तर बरे होईल.
हिंदुत्वादी संघटनांनी 23 तारखेला कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. या बंदला शिवसेनेचा पाठिंबा असणार आहे. मुस्लिम समाजाच्या मोर्चात हिंदूंबाबत वक्तव्य केल्याचा दावा केला जात आहे. या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला आहे. मुस्लिम मोर्चात राहुल कांबळे नामक व्यक्तीने अपशब्द वापरल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे कोल्हापूर बंदची हाक दिली गेली आहे. हा बंद यशस्वी करण्याचं आवाहन राजेश क्षीरसागर यांनी केलं आहे.
महायुतीतील इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटलांना गेली, तर मी जोरात काम करेल, असं विधान इंदापूरचे आमदार राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी केलंय. भरणे इंदापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते. इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जाते की, हर्षवर्धन पाटलांना मिळते? अशीच चर्चा सुरु आहे. अशात आमदार दत्तात्रय भरणे यांनी हे मोठं विधान केलंय.
मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आलाय. आता पोलिसांकडून आंदोलकांची धडपकड सुरू आहे.
वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार मंत्रालयाच्या गेटवर धडकले आहेत. मंत्रालयासमोर हे आंदोलन सुरू आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी MPSC च्या अध्यक्षांना केली आहे मोठी विनंती
सुप्रिया सुळे या पुण्यात पोहोचल्या आहेत, यावेळी त्यांनी MPSC च्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतलीये.
ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी दिला राजीनामा. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपमध्ये गळतीला सुरुवात
पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून एनसीपीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. काल रात्री 8 वाजल्यापासून नवी पेठ येथील अहिल्यादेवी अभ्यासिकेच्या समोर विद्यार्थी आंदोलन करीत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात भाजपमध्ये गळतीला सुरुवात झाली आहे. समरजीत घाटगे यांच्यापाठोपाठ आता राहुल देसाई यांनी देखील पदाचा राजीनामा दिला आहे.
कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार. रामगिरीं महाराजांना भेटायला शिंदेंकडे वेळ. पण पीडित मुलीच्या घरी जायला त्यांना वेळ नाही. वामन म्हात्रेला अटक झाली पाहिजे. सुषमा अंधारे यांचं बदलापुरात आंदोलन.
नराधमांना कडक शासन झालं पाहिजे. त्यांना पुन्हा अशा गोष्टी करण्याच धाडस नाही झालं पाहिजे, असं शासन केलं पाहिजे. मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी बदलापूर घटनेवर दिली.
कल्याण कोर्टाने आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील हा मुख्य आरोपी आहे. आरती सिंह यांच्या नेतृत्वात बदलापूर प्रकरणाची SIT चौकशी होणार आहे.
बदलापूरमधील घटना दुर्दैवी आहे. कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. कालचं आंदोलन राजकीय प्रेरित होतं. रेल्वे प्रवाशांना त्याचा त्रास झाला. शाळा चालवणाऱ्या संस्थाचालकांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
कल्याण न्यायालयात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणाचा आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयात हजर करणार असल्याने पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. काल आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत बदलापूरकरांनी मोठं आंदोलन केलं होतं.
बदलापूरमधील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आदर्श शाळेत पोलिसांचा बंदोबस्त अजूनही तैनात आहे. बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेरही पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. शहरातील इंटरनेट बंद आहेत.
बदलापुरातील आंदोलनप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले आहेत. दोन हजारहून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 40 जणांना अटक करण्यात आली आहे. राड्यासाठी कारणीभूत ठरलेल्या भाषणाची चौकशी होणार आहे.
“तक्रार न घेण्यासाठी पोलिसांवर दबाव होता. कालच्या घटनेची दखल सुप्रीम कोर्टाने का घेतली नाही? बदलापूरच्या घटनेशी विरोधकांचा काय संबंध? गिरीश महाजनांचं डोकं फिरलंय,” अशा शब्दांत राऊतांनी फटकारलंय.
बदलापुरातील ती शाळा भाजपशी संबंधित आहे. फडणवीसांच्या तोंडी SIT शब्द शोभत नाही. लोक उद्रेकाने रस्त्यावर उतरले, मग त्यांच्यावर खटले काय दाखल करता?, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील काजीखेडा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाकडूनच सहा विद्यार्थीनींचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. शिक्षकाने विद्यार्थीनींना अश्लील व्हीडिओ फोटो दाखवले होते. आरोपी शिक्षक प्रमोद सरदारला पोलिसांनी अटक केली आहे. आज आरोपी शिक्षकाला पोलीस अकोल्याच्या न्यायालयात हजर करणार आहेत. पोलीस आरोपीची पीसीआर मागणार आहेत. आज पुन्हा पोलीस शाळेत चौकशीसाठी दाखल झालेत.
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आंदोलन करणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील गुडलक चौकामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात आणि बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पवार गटाकडून आंदोलन केलं जाणार आहे.
ऑलम्पिक वीर स्वप्निल कुसाळे याच थोड्याच वेळात कोल्हापुरात आगमन होणार आहे. कोल्हापूरकरांकडून स्वप्निल कुसाळेच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे. ताराराणी चौकातून दसरा चौकापर्यंत स्वप्निल कुसाळेची मिरवणूक काढली जाणार आहे. मिरवणूक मार्गात हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी देखील केली जाणार आहे. स्वप्निल कुसाळेच्या स्वागताला पालकमंत्री हसनमुश्रीफ आणि अन्य नेते उपस्थित आहेत.
नाशिकच्या पंचवटीत परिसरात युवकाची निर्घृणपणे हत्या केली आहे. पंचवटी परिसरातील मेरी कंपाऊंड मराठा समाज वस्तीगृहबाहेर हत्या झाली आहे. गगन आकाश कोकाटे या युवकाची निर्घृण हत्या झालीये. युवकाच्या डोक्यात तीक्ष्णहत्याराने वार करून हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. गगन हा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. हत्येने परिसरातील नागरिक भयभीत झालेत.
– शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर
– आज नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा तर उद्या येवला, मनमाड आणि निफाड मध्ये घेणार सभा
– आदित्य ठाकरे उद्या छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात सभा घेणार असल्याने या सभेकडे विशेष लक्ष
– तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या नांदगाव मनमाड मतदारसंघाचा आदित्य ठाकरे करणार दौरा
– आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा नाशिक जिल्हा दौरा महत्त्वाचा
बदलापूर लैंगिक अत्याचार खटला चालविण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती
13 तारखेला बदलापूर येथील एका शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती
त्यानंतर बदलापूरमध्ये रेल रोको व तोडफोड करत स्थानिकांकडून आंदोलन करण्यात आले होते
नागरिकांचे आंदोलन पाहता दीपक केसरकर, गिरीश महाजन यांनी काल ही केस फास्ट ट्रॅकवर चालवणार असल्याचे सांगितले
तसेच उज्ज्वल निकम या केसवर काम करणार असल्याचे केले होते आव्हान
– पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भुकूम ग्रामपंचातीच्या वतीने, गावातील युवतींना सशक्तीकरणासाठी मर्दानी खेळांचे प्रशिक्षण
– गावातील 60 मुलींना महिनाभर प्रशिक्षक चंद्रकांत पवार यांच्या सहकार्याने लाठी काठी, दानपट्टा यांसारख्या मर्दानी खेळांचे देण्यात आलं प्रशिक्षण
– महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुलींना स्वतःचे संरक्षण करता यावे यासाठी देण्यात आलं प्रशिक्षण
– घेतलेले प्रशिक्षण समाजातील प्रत्येक युवतीपर्यंत पोहोचविण्याची शपथ घेत, रायरेश्वर किल्यावर प्रशिक्षणाचा करण्यात आला समारोप
कोलकात्यात घडलेल्या घटनेनंतर ससून रुग्णालय अलर्ट मोडवर
ससून रुग्णालयाची सीमाभिंत उंचावली जाणार
१०० नवीन सीसीटीव्ही हे ससून रुग्णालय परिसरात बसवले जाणार
कोलकात्यात झालेल्या महिला डॉक्टरवर अत्याचारानंतर प्रशासनाचा निर्णय
९० ते ९५ आणखी सुरक्षा रक्षक वाढवले जाणार आहेत
Maharashtra News Live : बदलापूर रेल्वे स्टेशनवरील आंदोलनकर्त्यांकडून झालेल्या दगडफेकीत चार ते पाच पोलीस किरकोळ जखमी
तर कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुंडलिक उगले याच्या पायाला दगड लागल्यामुळे रक्तबंबाळ