महाविकास आघाडीचे गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष, राज्य सरकार अपयशी; केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा हल्लाबोल

| Updated on: Mar 11, 2022 | 10:00 AM

केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, विजेचा प्रश्न, एसटी संप, विद्यार्थ्यांच्या परीक्षेत घोळ यामुळे आता जनताच महविकास आघाडी सरकारला नाकारेल. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी आमचा कुठलाही सहभाग राहणार नाही. हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितले आहे. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांचे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनात आमचे कार्यकर्ते मागे हटणार नाहीत, अशा इशाराही त्यांनी दिला.

महाविकास आघाडीचे गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष, राज्य सरकार अपयशी; केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा हल्लाबोल
केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार लासलगाव दौऱ्यावर होत्या.
Follow us on

लासलगावः राज्यातील कामांमध्ये महाविकास आघाडीचे लक्ष नाही. गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे, असा जोरदार हल्लाबोल केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांनी केला. त्या लासलगावमध्ये आल्या असता टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या. डॉ. पवार म्हणाल्या की, विजेचा प्रश्न, एसटी संप, विद्यार्थ्यांच्या परीक्षेत घोळ यामुळे आता जनताच महविकास आघाडी सरकारला नाकारेल. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी आमचा कुठलाही सहभाग राहणार नाही. हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही सांगितले आहे. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांचे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनात भाजप (BJP) कार्यकर्ते मागे हटणार नाहीत, अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला. प्रत्येक राज्यात विकास कामांसाठी चालना देण्याचे काम भाजपने केले आहे. या पुढेही यातील सातत्य कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विकास मार्गावर वाटचाल

केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, पाच राज्यांच्या निवडणुकीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यांमधील विजय दिन आमच्यासाठी आनंदाचा, उत्साहाचा व ऐतिहासिक आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार ही राज्यातील नागरिकांनी पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. मागील सात वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात झालेल्या विकास कामांचा हा विजय आहे. आपण कोरोना संकट काळात लस तयार केली व इतर देशांनाही पुरविली. चारही राज्यातील मुख्यमंत्र्यांची विकास कामे असल्यामुळे पुन्हा जनतेने हा निकाल देऊन स्पष्ट केल्याचे त्या म्हणाल्या.

विश्वासात घेतले पण…

गोवा विधानसभेत पणजी मतदार संघातून माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल यांचा पराभव झाल्याने त्यांचे बंड फसले का, असा प्रश्न विचारला असता डॉ. भारती पवार म्हणाल्या की, मनोहर पर्रिकर हे आमचे ज्येष्ठ नेते होते. गोव्यात त्यांनी अनेक विकास कामे केली. गोवा विधानसभा निवडणुकीअगोदर गोवा प्रभारी व महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल पर्रिकर यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्नही केला. मात्र, ते अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम होते. त्यामुळे हा जनतेने दिलेला कौल स्वीकारावे लागेल म्हणत त्यांनी यावर बोलणे टाळले.

मोदींविरोधात भडकावले

केंद्रीय मंत्री भारती पवार म्हणाल्या की, पंजाब राज्यात काँग्रेसचे सरकार गेले. मुख्यमंत्री चन्नी यांना दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला. काँग्रेसने नेहमीच वेगळे राजकारण करत जनतेत भ्रम निर्माण केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भडकवण्याचे काम केले. मात्र, पंजाब वगळता उत्तराखंडसह चारही राज्यांमध्ये जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले. पंजाबमध्ये यापूर्वी आम्ही युती करून निवडणूक लढवली होती. यंदा आम्ही स्वबळावर निवडणूक लढवली. तरीही जनतेने आम्हाला चांगली मते दिली. पंजाब मधील जनतेच्या सेवेसाठी भाजप कमी पडणार नाही. प्रत्येक राज्यात विकास कामांसाठी चालना देण्याचे काम भाजपने केले असून, या पुढेही सातत्य कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इतर बातम्याः

Nashik | उद्योजकाच्या घरावर दरोडा; बाळाच्या मानेवर सुरा ठेवून 50 तोळे सोने लुटले, महिलांचे तोंड चिकटपट्टीने बंद!

नाशिक – दिंडोरी सिटी बस सुरू; गामीण भागात वाढवला विस्तार, मार्ग काय राहणार?

मालेगाव महापालिकेचे प्रताप; पोलीस मैदानाच्या सरकारी जागेची इदगाह ट्रस्टला खिरापत