रत्नागिरी : शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी अधिवेशनात लक्षवेधी (Assembly Session) मांडत भगवान कोकरे (Bhagwan Kokre) यांच्यावर आरोप केले. मात्र भगवान कोकरे यांनी आता भास्कर जाधवांवर जोरदार पलटवार केलाय. भास्कर जाधव हे औरंगजेबाचं काम करत आहेत, त्यांचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही, असे खुलं आव्हान त्यांनी दिलंय. भास्कर जाधव यांच्या लक्षवेधीवर लोटे येथील गोशाळा चालवणाऱ्या भगवान कोकरे यांनी काही गंभीर आरोपही केले आहेत. तस्करी करणाऱ्यांच्या तावडीतून सोडवून गाईची सेवा करणाऱ्ंयावर कारवाईसाठी भास्कर जाधवांची लक्षवेधी ही चुकीची आहे. कोणतीही चौकशी करा. दोषी असेन तर म्हणाल ती शिक्षा भोगायला मी तयार. पण, उगाच टार्गेट करू नका, असेही कोकरे म्हणाले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता पुन्हा नवं वळण घेत आहे.
गोधनाची तस्करी करणाऱ्याच्या गाड्या मी अडवतो म्हणून मला टार्गेट केलं जातंय, असा भगवान कोकरे यांनी भास्कर जाधव यांच्यावर गंभीर आरोप केलाय. आणि वाट्टेल ते झालं तरी यांचा मनसुबा पूर्ण होऊ देणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत गोसेवा कारणार, असेही ते म्हणाले आहेत. भास्कर जाधवांनी 100 गायी एक महिन्याकरता पाळून दाखवाव्यात, असे खुलं आव्हान भगवान कोकोरे यांनी भास्कर जाधव यांना दिलं आहे. लोकवर्गणी जमा करून मी गायीची सेवा करतो, कौटुंबिक सुखाला तिलांजली दिली. मदत न करता उगाच काहीही बोलता. तुम्हाला गोशाळेच नाव माहीत नाही आणि अपुऱ्या माहितीवर आरोप करता, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
अंगावर भगवा घेऊन धर्म संपवण्याच काम शिवसेना करत असल्याचा आरोपही त्यानी केला याहे. कितीही लक्षवेधी मांडा,मी माझं काम करत राहणार. राज्यातील कोणत्याही व्यक्तीने गोशालेला भेट द्या. तुम्हाला काही चुकीचं वाटलं तर तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगेन. माझा वाळूचा ड्रेझर नाही, कुठलं कॉन्ट्रॅक्ट नाही, कसली टक्केवारी नाही. मी 10/20 रुपये जमा करून हे काम करतो. आज 900 गाई मी पाळतोय. माझा आवाज दाबला जाऊ शकत नाही. अंगावर भगवा घालून औरंजेबाचं काम करणाऱ्या भास्कर जाधवांचा बुरखा फडल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी शेवटी बोलताना दिला आहे. 20 वर्षात भास्कर जाधवांनी किती गुन्हे केलेत ? ते पहाता ते माझ्यावर हल्ला करतील. अशी शंकाही त्यांनी उपस्थित केलीय.
नव्या धमकी बद्दल धन्यवाद, महाग पडेल म्हणजे? Ed पकडून आणखी एक खोटे कांड करणार का? संजय राऊतांचा सवाल
माजी नगरसेवक Nitish Gwalwanshi यांचा काँग्रेसला हात, नितीन गडकरींच्या घरी भाजपात प्रवेश