चिपळूणः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असतानाच ठाकरे गटाकडून मात्र शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेण्याच्या कार्यक्रमावर ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली आहे.
विधानभवनात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे, त्याचा कार्यक्रमपत्रिके बाळासाहेब ठाकेर यांचे चिरंजीव आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नाही.
त्यावरून ही ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या विविध घटनांवरुन ठाकरे गटाचे नेते आमदार भास्करराव जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
भास्करराव जाधव यांनी टीका करताना भास्करराव जाधव यांनी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करुन महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकले होते.
त्यावरून शिवसेनेच दोन गट पडल्यानंतर धनुष्यबाणावरून ही कायदेशीर लढाई सुरू झाली. त्यावरुनही जोरदार टीका टिप्पणी केली गेली आहे.
धनुष्यबाणावरुन दोन्ही गट दावा करत असले तरी त्या चिन्हाचा कायदेशीर लढाई कोण जिंकणार आणि चिन्ह कोणाला मिळणार याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
शिंदे गटाने आधी बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचे काम केले आहे आणि आता धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचं कामंही शिंदे गटाने केले असल्याची टीका ठाकरे गटाने केली आहे.
त्यामुळेच आज नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार असल्याने बाळासाहेबांच्या स्मृती दर्शनाच्या कार्यक्रमावर आमदार भास्करराव जाधव यांनी जोरदार टीका केली आहे.
शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दर्शनाच्या कार्यक्रम जाहीर केल्यानंतर भास्करराव जाधव यांनी त्यांच्यावर जोरदार निशाण साधत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून खाली खेचण्याचे पाप शिंदे गटाने केले असल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे केलेल्या पापातून कुठेतरी आपल्याला मुक्तता मिळावी म्हणून शिंदे गट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेत आहे. त्याच बरोबर आपण केलेले पाप शिंदे गटाला सतावत आहे, म्हणून त्यांनी बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊन नाक घासत असावेत अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.