मुंबई : भीमशक्ती-शिवशक्ती(Bhimshakti-Shivashakti ) या लढवय्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पँथर भाई कांबळे यांच्यासह संघटनेचे हजारो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
भीमशक्ती-शिवशक्ती (महाराष्ट्र प्रदेश) यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,लोकजनशक्ती पार्टी,तसेच अल्पसंख्याक समुदाय,आदिवासीं बांधव यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
भीमशक्ती शिवशक्ती च्या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा म्हणून मागील दोन वर्षे शिवसेना नेत्या श्रध्दा जाधव या नेत्यांच्या संपर्कात होत्या.
केंद्रातील सरकार भाजपा भारताचे संविधान बदलणे छेडछाड करत आहे, ते खपवून घेतलं जाणार नाही, महाराष्ट्रात भाजपाला रोखण्यासाठी बहुजन समाज तेवढ्याच ताकदीने भीमशक्ती शिवशक्ती त सहभागी होत आहे, हाच जण समुदाय राज्यात जातीवादी भाजपला रोखेल असे भाई कांबळे म्हणाले
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना मागील अडिच वर्षात उद्धवजी ठाकरे यांनी सर्वोत्तम उत्तमोत्तम केलेले प्रशासकीय कामकाज, कोरोना काळात केलेले उत्तम कार्य, धाडसी निर्णय, जनतेची घेतलेली काळजी आणि कुटुंबातील व्यक्ती म्हणून घेतलेली काळजी तसेच परिवाराप्रमाणे आमच्याशी साधलेला जिव्हाळ्याचा संवाद अतिशय प्रेरणादायी राहिला असल्याने रिपब्लिकन आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता भारावून गेला आहे.
कार्याची गौरवगाथा तथा आपले समाजाप्रति उल्लेखनीय असे कार्य पाहून उस्फुर्तपणे आणि मोठ्या संख्येने शिवसेनेसारख्या मोठ्या प्रवाहात भीमसागर दसऱ्याच्या पूर्व संध्येला शिवसेना पक्षात दसऱ्याच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी येणार असल्याचेही कांबळे म्हणाले.
आगामी निवडणूकित सत्तेचे सोने शिवसेनेच्या पदरात कसे पाडून घेईल याच उद्धेशाने बहुजन हिताय,बहुनज सुखाय हाच विचार घेवून भीमशक्ती-शिवशक्तीने शिवसेनेत प्रवेश केल्याचे ते म्हणाले.