पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मेला होणार आहे. या टप्प्यातील मतदार संघाच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. आज भिवंडीमध्ये महायुतीची सभा झाली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. पाच वर्षात पाच पंतप्रधान करणार असं पोपटलाल म्हणाले… उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये केवळ आदित्य ठाकरेंसाठी जागा आहे. शरद पवार यांच्या इंजिनमध्ये केवळ सुप्रिया सुळे यांना जागा आहे आणि काँग्रेसच्या इंजिनमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनाच जागा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मी माझी शेवटची सभा आहे भिवंडीत घेण्याचं ठरवलं होतं. भिवंडीकरांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने कपिल पाटील निवडून येणार आहेत. मार्च महिन्यापासून सभा सुरू झाल्या. ही माझी 115 वी सभा आहे.आमच्याकडे पंतप्रधानांचे नाव आहे. मात्र समजा की इंडिया आघाडीचा विजय झाला त्यांच्याकडे पंतप्रधान कोणाला करणार? संगीत खुर्ची खेळून इंडिया वाले पंतप्रधान निवडणार का?, असं म्हणत देवेंद्र फडवणीस यांनी इंडिया आघाडीला सवाल केलाय.
भिवंडीमध्ये कपिल पाटील यांचा चेहरा बदलला आहे. आमची महायुती मेट्रोसारखी आहे. त्यात नरेंद्र मोदी हे मजबूत इंजिन आहे. आमच्या मेट्रोमध्ये सर्वांना बसायला संधी मिळते. मोदींनी देशातील 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर आणलं आहे. तर लोकांच्या घरामध्ये पिण्याचे पाणी 60 लोकांच्या घरी पोहोचवला आहे. 70 वर्षावरील व्यक्तींचा पाच लाखापर्यंत उपचार मोफत नरेंद्र मोदी यांनी केलाय, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भारताने स्वतःची लस बनवली नरेंद्र मोदींमुळे… कोरोनामुळे भारतात अनेकजण मृत्यूमुखी पडले, अशी जगात चर्चा होती. आज आपण सगळेजण मोदींच्या लसमुळे जिवंत आहोत. नरेंद्र मोदी मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मला नुसत्या शिव्या देत असतात. मोदी केवळ भारताचे नाही तर विश्वासाचे नेते आहेत. पाकिस्तानातून राहुल गांधींच्या समर्थनात ट्विट केले जातात. उद्धव ठाकरेच्या गटाच्या प्रचारात पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातात. बाळासाहेब आज असते तर त्यांना कुठे कुठे मारलं असतं माहिती नाही. जगभरात नरेंद्र मोदी यांची स्तुती आहे इंडिया वाले फक्त मोदींना शिव्या देतात. ज्याने रामाला आणला आहे आम्ही त्यांना आणणार आहोत, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.