पितृपक्षात कोणत्या विधी करतात आणि का? धार्मिक स्थळी वेटिंग…

| Updated on: Sep 13, 2022 | 6:24 PM

नारायण नागबली, कालसर्प दोष योग, त्रिपिंडी श्राद्ध या पूजा केल्यानं सुख, समृद्धी शांती, नांदते स्थिर्य लाभते अशी भाविकांची भावना आहे.

पितृपक्षात कोणत्या विधी करतात आणि का? धार्मिक स्थळी वेटिंग...
Image Credit source: FACEBOOK
Follow us on

नाशिक : सध्या पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. पितृपक्षात आर्थिक व्यवहार करणे शक्यतोवर अनेक जण टाळतात. मात्र, असे असतांना धार्मिकस्थळी पितृपक्ष फलदायी ठरत असल्याचे चित्र आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) आणि नाशिकच्या रामकुंडावर (Nashik Ramkund) मोठ्या प्रमाणात अर्थकारण सुरू आहे. कोरोनानंतरचा (Corona) मोकळीक असलेला पहिलाच पितृपक्ष असल्याने अनेक भाविकांनी या दोन्हीही ठिकाणी मोठी गर्दी केली आहे. यंदाच्या पितृपक्षात आत्तापर्यंतची सर्वाधिक मोठी गर्दी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पिंडाला काकस्पर्श होवो अथवा ना होवो धार्मिक नगरीचे अर्थकारण पुन्हा एकदा रुळावर आले आहे.

नारायण नागबली, कालसर्प दोष योग, त्रिपिंडी श्राद्ध या पूजा केल्यानं सुख, समृद्धी शांती, नांदते स्थिर्य लाभते अशी भाविकांची भावना आहे.

त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये दिवसाकाठी 20 ते 25 हजार भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यातील अनेक भाविक या पूजा करतात.

पितृ पक्षात नवीन आर्थिक व्यव्यहार करत नाहीत. शुभ कार्यासाठी पितृपक्षा नंतरचा मुहूर्त शोधतात, परंतु हाच पितृपक्ष धार्मिक नगरीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी धार्जिणा ठरतो आहे.

कालसर्प शांतीला 2100 ते 3000 नारायण नागबलीला 5 ते 8 हजार आणि त्रिपिंडी साठी 3 हजारापर्यंत खर्च येत असतो. राहणे आणि अतिरिक्त खर्च हा वेगळा असतो.

कोरोना काळात या सर्व पूजा बंद होत्या, त्यामुळे आता प्रलंबित असलेल्या पूजा करण्यासाठी त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या रामकुंडावर गर्दी बघायला मिळत आहे.

या दोन्हीही पूजा करण्यासाठी वर्षभरात जितकी संख्या असते तितकीच संख्या या पंधरवड्यात बघायला मिळतेय, त्यामुळे अनेकांना पूजाविधी करण्यासाठी वेटिंगवर राहण्याची वेळ आली आहे.

पितृपक्षात कोणत्या पूजा करतात –

पितृपक्षात नारायण नागबली, कालसर्प दोष योग या दोन्ही पूजा केल्या जातात. धार्मिकस्थळी पुरोहितांच्या माध्यमातून या पूजा करतात. नाशिकच्या त्र्यंबकनगरीत, रामकुंडावर या पूजा करण्यावर नागरिकांचा भर असतो.