तिथे लीडरशीप स्ट्रॉंग होती इथं आम्ही…काय म्हणाले अजितदादा लोकसभा पराभवावर

| Updated on: Aug 15, 2024 | 5:45 PM

अजितदादांची मुलाखत एएनआय वृत्तसंस्थेच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी पॉडकास्टवर घेतली. त्यात अजितदादांना आपल्या राजकीय प्रवासाबद्दल सांगितले.

तिथे लीडरशीप स्ट्रॉंग होती इथं आम्ही...काय म्हणाले अजितदादा लोकसभा पराभवावर
Follow us on

लोकसभा निवडणूकानंतर महायुतीत चलबिचल सुरु आहे.त्यातच आता महायुतीला विधानसभा निवडणूकांना सामोरे जायचे आहे. या पार्श्वभूमीवर दोन पक्षांना फोडूनही लोकसभेला महाराष्ट्राने साथ दिली नसल्याने महायुती आता दूधाने तोंड भाजल्यान ताकही फुंकून पित आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यासंदर्भात एएनआयला मुलाखत दिली आहे.यात त्यांनी पुढील राजकारणाविषयी भाष्य केलेले आहे.राजकारणात आपण कुटुंबाला आणायला नको होते असाही पुनरुच्चार अजितदादांनी या मुलाखतीत केलेल आहे. लोकसभा प्रचारात चारसो पारच्या घोषणा करतान घटना बदलणार असा संदेश दलित आणि अल्पसंख्यांकात गेल्याने महाराष्ट्रात आम्हाला यश मिळाले नसल्याचे अजितदादांनी मुलाखतीत म्हटलेले आहे.

अजितदादा  पुढे म्हणाले की आम्ही पूर्ण प्रयत्न केला होता. पण संविधान बदलण्याचा आणि आरक्षण जाण्याचा मुद्दा लोकांच्या मनातून गेला नाही. लोकांना ते खरं वाटलं. त्यामुळे आमच्यापासून मतदार दुरावला असेही ते म्हणाले.सीएए कायद्याबाबत अपप्रचार केला गेला. आपल्या देशाच्या बाहेर राहणाऱ्या भारतीयांना आणण्यासाठी सीएए कायदा आणला होता. देशाच्या बाहेर २०-२५ वर्ष राहणाऱ्यांना देशात आणण्यासाठी कायदा नव्हता. पण मायनॉरिटीला वाटलं आपल्याला देशातून हाकलून देण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे, असं वाटलं. आपल्याला हटवून दुसऱ्यांना आत घेणार आहेत, असं त्यांना वाटलं होतं. त्यामुळे अल्पसंख्याक भयभीत होते असे अजितदादा यावेळी म्हणाले.

तिथे लीडरशीप स्ट्रॉंग होती

बिहारमध्ये हे झालं नाही. मध्यप्रदेशात झालं नाही. तेथे या अपप्रचाराचा परिणाम झाला नाही. चंद्राबाबू नायडू, शिवराज चौहान आणि नितीश कुमार, चिराग पासवान सोबत होते. तिथे लीडरशीप तिथे स्ट्राँग होती. त्यामुळे त्यांनी निवडणुकीत प्रचार केला. पण आम्ही महाराष्ट्रात कमी पडलो. आघाडी सरकारमुळे नाह तर संविधान बदलण्याचा मुद्दा एवढा महागात पडेल असं वाटलं नव्हतं. थोडी जाणीव होती, पण एवढा फरक पडेल असं वाटत नव्हतं असेही अजितदादा यांनी सांगितले.