मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईत आज भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात शिरून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेस कार्यालयाबाहेर तुफान राडा झाला. त्यानंतर पोलिसांकडून भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. भाजपनं छुप्या पद्धतीनं हा मोर्चा काढल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. या प्रकारावरून वातावरण चांगलंच तापलं असून, विरोधकांकडून या हल्ल्यानंतर आता भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
काँग्रेस कार्यालयावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम चोप दिला, दुसरीकडे मात्र पोलीस उशिरा आल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयावर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते कार्यालयात घुसत असल्याचं पाहायला मिळत आहे, कार्यालयाचं बंद दार उघडण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला. त्यानंतर कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याच या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
दरम्यान दुसरीकडे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी जोरदार लाठीचार्ज केला. भाजप कार्यकर्त्यांना बेदम चोप देण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांच्या हातात जो फलक होता, त्यावर काँग्रेस संविधानाचा आपमान करत आहे, अशा आशायाचा मजकूर होता. यावेळी आंदोलकांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशी घोषणाबाजी देखील सुरू होती.
जोरदार राडा झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलकांनी कार्यालायाचा दरवाजा देखील तोडण्याचा प्रयत्न केला. ऑफिसमधील खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. घटनास्थळी एकच गोंधळ उडाला, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. यामुळे परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.