भाजप आणि संघ हाच फेक नरेटिव्हचा कारखाना – संजय राऊत

| Updated on: Oct 05, 2024 | 10:47 AM

कोणताही फेक नरेटिव्ह कोणीही सेट केलेला नाही. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच फेक नरेटिव्ह सेट करण्याचा कारखाना आहे , असा आरोप संजय राऊत यांनी केला.

भाजप आणि संघ हाच फेक नरेटिव्हचा कारखाना - संजय राऊत
संजय राऊत यांची भाजप, संघावर टीका
Follow us on

राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.याच दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघही आता निवडणुकीसाठी प्रचारात उतरणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. कोणताही फेक नरेटिव्ह कोणीही सेट केलेला नाही. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच फेक नरेटिव्ह सेट करण्याचा कारखाना आहे , असा आरोप त्यांनी केला. धुळ्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजप, संघावर टीकास्त्र सोडलं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता प्रचारासाठी मैदानात उतरणार असून गेल्या निवडणुकीत जो फेक नरेटिव्ह सेट करण्यात आला, त्याबद्दल जनजागृती करणार आहे. फेक नरेटिव्हला उत्तर देण्याासाठी संघाने कसून तयारी केल्याचीही माहिती आहे. यासंदर्भात संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी भाजप, संघावर हल्ला चढवला.

काय म्हणाले संजय राऊत ?

कोणीही कसलाही फेक नरेटिव्ह सेट केलेला नाही. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच फेक नरेटिव्ह सेट करण्याचा कारखाना आहे. तर आरएसएस खरोखरच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असेल तर ते कोणतातरी वेगळा, अजून एक फेक नरेटिव्ह सेट करतील. आरएसएस ही एक सांस्कृतिक संघटना आहे, राजकीय नाही असं मी आत्तापर्यंत ऐकत होतो. पण आम्ही निवडणुकीत उतरणार आहोत, असं जर त्यांनी अधिकृतपणे जाहीर केलं असेल तर त्यांनीच त्यांची भूमिका जाहीर करावी असं ते म्हणाले.

भाजपसाठी मोदी गल्लीबोळात फिरत आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून वाशिमसह ठाणे, नवी मुंबईमध्येही ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.  वाशिममध्ये सुमारे 23,300 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा मोदींच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. तसेच बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचे देखील पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

त्यांच्या या दौऱ्यावरूनही संजय राऊतांनी निशाणा साधला आहे.  देशाचे पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात डेरा टाकून बसले आहेत. भारतीय जनता पक्षासाठी पंतप्रधान गल्लीबोळात फिरत आहेत , अशी टीका त्यांनी केली.