मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बालेकिल्यातच भाजपचं आव्हान, ‘मुंडे’ यांनी केली अशी तयारी…

| Updated on: Jun 04, 2023 | 9:58 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना आव्हान देण्याची तयारी भाजपने केली आहे. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री शिंदे इथे आल्यास त्याचे स्वागत कशा पद्धतीने करणार याची माहितीच भाजप नेत्यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बालेकिल्यातच भाजपचं आव्हान, मुंडे यांनी केली अशी तयारी...
CM EKNATH SHINDE VS BJP
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

ठाणे : तक्रारी केल्या, पुरावे दिले, तरीही पालिका प्रशासन काही हलत नाही. राजरोस अनधिकृत बांधकांमे सुरु आहेत. त्यावर काही कारवाई नाही. याला आयुक्त, पालिका अधिकारी आणि शिवसेना नेते जबाबदार आहेत असा आरोप करत भाजप आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना आव्हान देण्याची तयारी भाजपने केली आहे. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री शिंदे इथे आल्यास त्याचे स्वागत कशा पद्धतीने करणार याची माहितीच भाजप नेत्यांनी दिली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पवित्र घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

एकीकडे राज्यात सेना भाजप मिळून सत्ता बनवली असली तरी दिवा शहरात मात्र सेना भाजप आमने सामने आल्याचे चित्र आहे. शहरात अनधिकृत बांधकामे जोमाने सुरू आहेत. आयुक्त, पालिका अधिकारी आणि दिव्यातील शिवसेना नेते याला जबाबदार आहेत असा आरोप भारतीय जनता पार्टीचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

वारंवार तक्रारी देऊनही पालिका प्रशासन अर्थपूर्ण संबंधामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत नाहीत. ही गंभीर बाब मुख्यमंत्री आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिवा दौऱ्यात अनधिकृत बांधकामांचे प्रदर्शन भरवण्याचा निर्णय भाजपने घेतल्याची माहिती मुंडे यांनी दिली.

मुख्यमंत्री दिव्यात येतील त्या दिवशी हे अनधिकृत बांधकामाचे प्रदर्शन भरवणार आहे. एकीकडे क्लस्टर योजना होत असताना दुसरीकडे अनधिकृत बांधकाम जोमाने वाढत असल्याने क्लस्टर योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचेही मुंडे म्हणाले.

पोटशूळ उठल्याने नाहक बदनामी – मढवी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिव्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या अशा कामांच्या भूमिपूजनसाठी दिव्यात येणार आहेत. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला आहे. ते नाहक बदनामी करत असल्याचा पलटवार माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी केलाय. ज्या माणसाने कधी विकासाचे राजकारण केले नाही अशा अडाणी माणसाने दिव्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय. अशा माणसाकडे काय लक्ष द्यायचे असा टोला मढवी यांनी लगावला आहे.