उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही – चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला

| Updated on: Nov 07, 2024 | 12:18 PM

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडूनही वचननामा जाहीह करण्यात आला. भाजप, शिंदे गटावर टीका करतानाचा उद्धव ठाकरे यांनी अनेक घोषणा केल्या. मात्र त्यांच्या याच जाहीरनाम्यावरून भाजपकडून टीका करण्यात आली आहे..

उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही - चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Follow us on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांकडून जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. याचदरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडूनही वचननामा जाहीह करण्यात आला. भाजप, शिंदे गटावर टीका करतानाचा उद्धव ठाकरे यांनी अनेक घोषणा केल्या. मात्र त्यांच्या याच जाहीरनाम्यावरून भाजपकडून टीका करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे. बाळासाहेबांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं पण उद्धव ठाकरेंच्या समोर फक्त कुटुंब आहे, असंही बावनकुळेंनी सुनावलंय.

X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?

अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला.

अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही.

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं. पण सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कुटुंबचं आहे. उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, अशी टीका त्यांनी केली आहे.