Gram panchayat election result 2022 : नागपुरात भाजपला किती जागा मिळणार? चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन अंकी आकडा सांगितला…

| Updated on: Dec 20, 2022 | 1:43 PM

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचं गणित सांगितलं...

Gram panchayat election result 2022 : नागपुरात भाजपला किती जागा मिळणार? चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन अंकी आकडा सांगितला...
Follow us on

मुंबई : राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान पार पडलं. या ग्रामपंचायतींचा आज निकाल (Gram Panchayat Election 2022) आहे. महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदेंगट दोन्हींकडून विजयाचा दावा केला जात आहे. त्यामुळे गुलाल कुणाचा यावरच सर्वत्र चर्चा होतेय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपला किती जागा मिळणार (Maharashtra Gram Panchayat Election Result) यावर भाष्य केलंय.

शिंदे-फडणवीस सरकार मागच्या काही दिवसांपासून राज्यात चांगलं काम करतंय. लोकांच्या हिताचे निर्णय घेतंय. सरकारच्या कामावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्याचा परिणाम दिसतोय.लोकांचं प्रेम त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठिशी आहेत. या निवडणुकीत भाजप आणि शिंदेगट अभूतपूर्व यश मिळवेल, असं विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केलाय.

नागपुरात किती जागा?

नागपुरातही भाजपला चांगलं यश मिळेल.दीडशेच्या वर ग्रामपंचायतींमध्ये भाजपला भरघोस यश मिळेल, असं विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केलाय.

काँग्रेसची अवस्था सध्या वाईट आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसपेक्षा अपक्ष जास्त निवडून येतील, असं वाटतंय, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला चिमटा घेतलाय.

ग्रामिण भागातील जनता आमच्या सरकारच्या पाठिशी आहे.लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निकालामध्ये भाजपचं वर्चस्व असणार हे निश्चित आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृ्त्वातील सरकारवर लोकांचा विश्वास आहे. हेच या निकालातून अधोरेखित होतंय, असं बावनकुळे म्हणालेत.

भाजपचे नेते ग्रामिण भागात गेले. प्रचार केला. मीही गेलो होतो. आमच्या सगळ्यांच्या मेहनतीचं हे फळ आहे, असंही बावनकुळे म्हणालेत.