बाळासाहेबांच्या शिवसेनेत दिवाळीनंतरही नाराजीचे फटाके फुटणार…काय आहे कारण ?

| Updated on: Nov 19, 2022 | 9:50 AM

भाजपलाच संधी का ? शिंदे गटात पात्र व्यक्ती नाहीत का ? असा सवाल उपस्थित केला जात असून नाराजी नाट्य रंगण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

बाळासाहेबांच्या शिवसेनेत दिवाळीनंतरही नाराजीचे फटाके फुटणार...काय आहे कारण ?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना खुश करण्यासाठी सत्ताधारी पक्ष विविध मंडळांवर नियुक्त्या करत असतं. त्यानुसार मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत, त्यातच बाजार समित्यांच्या अशासकीय प्रशासक मंडळावर वर्णी लावण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. त्यामध्ये दोन पक्षांचे सरकार असल्यावर स्पर्धा अधिकच असते. नाशिकमधील बाजार समितीच्या संदर्भात भाजपचा वरचष्मा असण्याची दाट शक्यता आहे. त्यातच निवडीवरून शिंदे गटात म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेत दिवाळी संपल्यानंतरही नाराजीचे फटाके फुटतील अशी शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील सत्तेत दोन पक्ष असल्याने आपलीच वर्णी लागावी यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. भाजप मात्र यामध्ये आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

नाशिकमधील बाजार समितीवर प्रशासकीय संचालक पदाच्या नियुक्त्या होणार आहे, याबाबत सरकारच्या वतिने नावे दिली जातात.

त्या नावावर उपनिबंधक कार्यालयाच्या माध्यमातून नियुक्ती दिली जात असते, जो पर्यन्त निवडणुका होत नाही तोपर्यंत शासकीय नियुक्त्या कारभार पाहत असतात.

हे सुद्धा वाचा

त्यासाठी आपल्याला बाजार समितीवर संचालक म्हणून नियुक्ती मिळावी यासाठी राजकीय पक्षात चढाओढ सुरू असते, यंदाही यावरून नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता आहे.

यामध्ये नाशिकच्या बाजार समिती बाबत भाजपने चार नाव सुचवली असून त्यावर जवळपास शिक्का मोर्तब होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शिंदे गट यामध्ये मागे पडला आहे.

बाजार समितीवर शासकीय नियुक्त्या कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याने शिंदे गटाला यामध्ये स्थान मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे.

भाजपलाच संधी का ? शिंदे गटात पात्र व्यक्ती नाहीत का ? असा सवाल उपस्थित केला जात असून नाराजी नाट्य रंगण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

दबक्या आवाजात शिंदे गटात जोरदार चर्चा सुरू असून सदस्य निवड झाल्यास हीच चर्चा आता मोठ्या आवाजात होऊन दोन्ही पक्षात वाद उभा राहण्याची शक्यता आहे.