कोल्हापूर: संजय राऊत दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर चिंतन करायला बसले तर बाळासाहेब वरुन त्यांच्या थोबाडीत मारतील, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. मला संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर दररोज टीका करायला आवडत नाही. मात्र, ते रोज काहीतरी बोलतात मग मलाही उत्तर द्याव लागतं, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
ते रविवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या, ‘ हा देश अजूनही नेहरूंच्या पुण्याईवर चाललाय’, या वक्तव्याचा समाचार घेतला. संजय राऊत यांनी एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर चिंतन करायला पाहिजे. त्यावेळी संजय राऊत यांनी बाळासाहेबांना हा प्रश्न विचारावा. मग बाळासाहेब ठाकरेही वरुन संजय राऊतांच्या थोबाडीत मारतील, अशी टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी केली.
अजूनही नेहरुंच्याच पुण्याईवर देश चाललाय; संजय राऊतांचा भाजपला टोला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे. नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. झोपेत असताना सरकार कसं आणायचं, हे अजित पवार यांना चांगलेच ठाऊक आहे. तुम्ही शरद पवार झोपेत असताना सरकार स्थापन करुन मोकळे झाला होतात. मात्र, अजित पवार यांना आपण काल काय केलं होतं, ही गोष्ट लक्षात राहत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
अजित पवार यांना तलवारीचा धाक दाखवून कोणी शपथविधीसाठी नेले नव्हते. त्यामुळे आपण ज्या भाजपसोबत तीन दिवसांचे सरकार स्थापन केले होते आणि ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो, त्यांच्याविषयी काय बोलतोय, याचे भान अजित पवार यांनी बाळगावे. तुम्हाला राष्ट्रवादीचे 28 आमदार तुमच्यासोबत ठेवता आले नाहीत. ते शरद पवारांकडे पुन्हा पळून गेले. हा अजित पवार यांचा दोष आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. तसेच अजित पवार यांना सगळीकडेच राहायचे असते. जिथे सरकार तिथे मी असलेच पाहिजे, अशी अजित पवारांची प्रवृत्ती असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
Video: संभाजी छत्रपतींची सरकारला सहकार्य करण्याची कृती मान्य नाही; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
औरंगजेबाला स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे, चंद्रकांतदादांना अजित पवार दिसतात: मिटकरी
चंद्रकांतदादांना स्वप्ने बघण्याचा छंद, त्यावर काय बोलणार?; जयंत पाटलांची खोचक टीका