कोल्हापूरः महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा सांगितल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले. महाराष्ट्रातील सीमाभागातील गावांवर थेट दावा सांगितल्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवरही विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आता खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.
संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना चित्रा वाघ यांनी सांगितले आहे की,आमचे सरकार फेसबुक सरकार नाही तर लोकांच्या फेसवर स्माईल आणणारे सरकार आहे असा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना लगावला आहे.
सध्या सीमावाद पेटला असून सीमाभागातील गावांवरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारने सीमाभागातील लोकांकडे दुर्लक्ष केले आहे अशी टीका सातत्याने या सरकारवर केली जात आहे.
त्याला प्रत्युत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या की, शिंदे- फडणवीस सरकार महाराष्ट्राची काळजी घेण्यासाठी सक्षम आहेत त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आपापले पक्ष सांभाळावेत अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली.
चित्रा वाघ यांचा सीमाप्रश्न आणि संजय राऊत यांच्यावर बोलताना हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी सीमावादाविषयी आपले भाजप सरकार हा वाद सोडवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आधी आपले पक्ष सांभाळावेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर सीमावादावर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा वाद सोडवण्यास आमचे सरकार सक्षम आहे असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.