नाशिक : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिला मुख्यमंत्री बसवायचे आहे असं विधान केले होते. त्यावर चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची हौस फिटली असल्याचे म्हंटले आहे. त्यांना जर महिला मुख्यमंत्री बसवायचे असेल तर चांगली गोष्ट आहे. उध्दव ठाकरे सद्गृहस्थ आहे. मुख्यमंत्री पदावर कुणीही बसलं तरी सद्सदविवेक बुद्धीने काम करावं अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे. मात्र, याच दरम्यान त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतांना त्यांच्या काळात महिलांवर किती अत्याचार झाले ? असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला आहे. संजय राठोड यांना त्यांच्याच सरकारने क्लीन चिट दिली होती, पण माझी लढाई सुरूच राहील असंही चित्रा वाघ यांनी म्हंटले आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महिला मुख्यमंत्री करायचे असल्याचे विधान केले होते, त्यावर चित्रा वाघ यांनी टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री होण्याची उद्धव ठाकरे यांची हौस फिटली आहे. त्यांना जर महिला मुख्यमंत्री बसवायची असेल तर चांगली गोष्ट आहे असं चित्रा वाघ यांनी म्हंटले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या काळात महिलांवर किती अत्याचार झाले ? असा सवाल देखील चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
याच दरम्यान त्यांनी विद्यमान सरकारच्या काळात मुंबईत झालेल्या एका अत्याचाराच्या घटनेत तात्काळ कारवाई केल्याने मुंबई पोलिसांचे आभार मानत ठाकरे सरकार आणि शिंदे सरकारची तुलना केली आहे.