मुंबई : ‘ आव्हाड नाहीसचं तू हाड हाड आहेस आणि तीच तुझी लायकी आहे’ अशा आक्रमक शब्दांत भारतीय जनात पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर टीका केली. ‘ तुमचा मेंदू सडल्याचं मी बोलले आणि तुम्ही लगेच ते सिद्धही करून दाखवलं’ असे टीकास्त्र त्यांनी सोडले. एक व्हिडीओ ट्विट करत चित्रा वाघ यांनी आव्हाड यांच्यावर शाब्दिक प्रहार केला. वैयक्तिक टीका खपवून घेणार नसल्याचे सांगत चित्रा वाघ यांनी आव्हाडांना चांगलेच सुनावले.
यापूर्वी काही दिवसांआधी चित्रा वाघ यांनी आव्हाडांच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख करत म्हटले होते की, सत्तेबरोबर मतीही गेली. आजकाल मविआच्या नेत्यांच्या डोक्यावर इतका परिणाम झालेला दिसतोय की, त्यांचा जीभेवरही ताबा राहिलेला नाही. जितेंद्र आव्हाडांचा मेंदूही त्यांच्या स्वभावाप्रमाणं सडत चाललाय, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आव्हाडांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते. त्या दोघांच्याही आरोप-प्रत्यारोपांच्याही फैरी सुरूच होत्या.
त्यानंतर आज चित्रा वाघ यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आव्हाडांना पुन्हा सुनावले. चित्रा वाघ म्हणाल्या, ‘ माझ्या राजकीय मुद्द्यांवर तुम्ही वैयक्तिक पातळींवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करत आहात. तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचं शस्त्र असतं. मी यापूर्वीही अशा प्रसंगांना सामोरे गेले आहे. बहिण म्हणून चारित्र्य हनन करणारी तुमच्या सारखी औलाद महाराष्ट्रात जन्माली आली हेच दुर्देव आहे. माझा राजकीय प्रवास तुमच्यासारखा नाही. तुम्ही जेव्हा ‘कुलू मनाली’ करत होता तेव्हा माझा संघर्ष सुरू होता. ‘
म्हणूनच तुमचा मेंदू सडल्याचं मी बोललेय जितेंद्र आव्हाड. आणि तुम्ही लगेच ते सिद्धही करून दाखवलं.
माझ्या राजकीय मुद्द्यांवर तुम्ही वैयक्तिक पातळींवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करताय,
तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचं शस्त्र असतं. मी… pic.twitter.com/MEcuQojgj9— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 9, 2023
‘ परमारच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार आणि त्यातून वाचवा म्हणत किती जणांचे किती वेळा पाय धरलेत हे सर्वांना माहिती आहे. तुमच्या बॉडीगार्डची आत्महत्या होती की हत्या केली तुम्ही त्याची ही चौकशी व्हायला हवी. तुमचा पीए कशामुळे तडीपार झाला, हेही लपून राहिलेलं नाही, पण मला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाहीये तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे ते पोलिसच बाहेर काढतील..’
‘ मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारा गिधाड आहेस तू ..तुमच्यासारख्या गिधाडांना मी सोडणार नाही आणि आत्ताही तुम्हाला पुरून उरणार. तू आव्हाड नाहीसचं, तू हाड हाड आहेस आणि तीच तुझी लायकी आहे. राजकीय मुद्द्यांवर बोलता येत नसेल तर तुझं थोबाड बंद ठेव माझ्या नादी लागू नकोस हे लक्षात ठेव’ अशा शब्दात चित्रा वाघ यांनी आव्हांडवर कडाडून टीका केली आहे.