भाजप नेते मोहित कंबोज यांचा बारमध्ये धिंगाणा, संजय राऊत यांनी ट्विट केला ‘तो’ व्हिडिओ

| Updated on: May 01, 2023 | 4:59 PM

संजय राऊत यांनी ट्विटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुंबई पोलीस आयुक्त आणि नार्कोटिक्स ब्युरोला टॅग केला आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांचा बारमध्ये धिंगाणा, संजय राऊत यांनी ट्विट केला तो व्हिडिओ
MOHIT KAMBHOJ AND SANJYA RAUT
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांचा बारमधील व्हिडिओ शेअर करत विरोधकांना हिंदुत्वावरून चांगलाच टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी ट्विटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुंबई पोलीस आयुक्त आणि नार्कोटिक्स ब्युरोला टॅग केला आहे. महाशय ! आपण काय कारवाई केली ते जनतेला कळू द्या. येथे अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री होत असल्याची माहिती आहे. भाजपचे हिंदुत्व येथे काय करत होते ? असा सवाल करत सीसीटीव्ही फुटेज लगेच ताब्यात घ्या.

संजय राऊत यांनी मोहित कंबोज यांचा रात्री बारमधील व्हिडिओ शेअर केला आहे. याप्रकरणी गृहमंत्री आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणाच्या खिशात आहेत ? शेवटपर्यंत पाहा पोलिस हतबल आहेत. हे तर काहीच नाही. कायद्याचे धिंडवडे काढणारे फुटेज मी पोलिस आयुक्तांना पाठवत आहे. मी वाट पाहतोय पोलिस काय कारवाई करत आहेत. हिंदुत्व नशेच्या व्यापारात अडकले आहे, असेही ते म्हणाले.

 

 

राज्याचे गृहमंत्री कुणाच्या खिशात आहेत

हा विडिओ शेअर केल्यानंतर राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री कुठे आहेत ? बेशुद्ध अवस्थेत पहाटे तीनपर्यंत भाजप नेते मुलींसोबत नाचत होते. बार बंद कार्यालय गेलेल्या पोलिसांसोबत हुज्जत घातली. राज्याचे गृहमंत्री कुणाच्या खिसात आहेत असा सवाल केला. तसेच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे कुणी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.