मुंबई : भाजपा आणि ठाकरे गटामधील शाब्दीक संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भाजपा, शिवसेना तसच ठाकरे गट परस्परावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. शिवसेना खासदार संजय राऊत दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपा आणि शिवसेनेला आपल्या शब्द बाणांनी घायाळ करु सोडतात. त्यानंतर भाजपाकडून नितेश राणे तसच इतर नेते त्यांना प्रत्युत्तर देतात. आता आमदार आणि भाजपा नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय.
भाजपा नेते प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटू शकते हे लक्षात घेऊन प्रसाद लाड यांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
‘राऊतांचं फिरलं डोकं, त्यांचं झालं लिपटनचं खोकं’
“मला धमकी देण्याची यांच्यात धमक नाही. आज जागतिक गद्दार दिन नाही, तर उद्धव ठाकरेंनी पळपुटे दिन म्हणून साजरा करावा” अशी बोचरी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे. “खरी शिवसेना शिंदेंची आहे. ठाकरे गटाचा वर्धापन दिन खोटा होता” असं प्रसाद लाड म्हणाले. ‘राऊतांचं फिरलं डोकं, त्यांचं झालं लिपटनचं खोकं’ असं लाड म्हणाले.
‘जळजळतय, मला मलमळतय अशी उद्धवजींची अवस्था’
“गद्दारी कोणी केली, हे संजय राऊत यांनी सांगू नये. ऱाऊत आणि उद्धव दोघे खरे गद्दार आहेत” असं प्रसाद लाड म्हणाले. “मला आनंद आहे, मी आमदार झालो आणि उद्दव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद गेलं. जळजळतय, मला मलमळतय अशी उद्धवजींची अवस्था आहे. पुढचं मला बोलायचं नाहीये” अशी टीका प्रसाद लाड यांनी केली.
“आम्ही बर्नल आणून ठेवले आहे. मी निवडून येणे आणि सरकार पडणे याचा मला आनंदच आहे” असं लाड यांनी सांगितलं.