काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गप का? त्यांच्यावर अन्याय झाला का..?; भाजप नेत्याची काँग्रेसवर सडकून टीका

| Updated on: Jan 25, 2023 | 10:31 PM

काँग्रेसमध्ये देशात अस्वस्थता असून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जेव्हा सुरू झाली होती, त्यावेळी भारत जोडोपेक्षा काँग्रेस छोडोचं काम सुरू झाल्याचं विखे पाटील यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गप  का? त्यांच्यावर अन्याय झाला का..?; भाजप नेत्याची काँग्रेसवर सडकून टीका
Follow us on

अहमदनगरः शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमुळे अहमदनगर आणि नाशिक मतदार संघ प्रचंड चर्चेत आले आहे. एकीकडे सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे आणि त्यांना भाजपकडून समर्थन मिळाल्यामुळे नाशिक आणि अहमदनगर चर्चेत आले. सत्यजित तांबे हे बाळासाहेब थोरात यांचे नातवाईक असल्यामुळे आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे बाळासाहेब थोरात नाव सत्यजित तांबे यांच्यामुळे प्रचंड चर्चेत आले. त्यामुळेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना जोरदार टोला लगावला आहे.

अहमदनगरला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल सूचक वक्तव्य केल आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना टोला लगावत येणाऱ्या काळात अनेक आश्चर्यकारक घटना आपल्याला पाहायला मिळतील अस सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी असे वक्तव्य केले असल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता ढवळून निघाले आहे. यावेळी बाळासाहेब थोरात यांना टोला लगावत असताना त्यांनी भारत जोडो यात्रेबद्दलही जोरदार टोलेबाजी केली आहे.

काँग्रेसमध्ये देशात अस्वस्थता असून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जेव्हा सुरू झाली होती, त्यावेळी भारत जोडोपेक्षा काँग्रेस छोडोचं काम सुरू झाल्याचं विखे पाटील यांनी म्हटले आहे.

अहमदनगर काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरात यांना टोला लगावला आहे. काँग्रेसमध्ये राजीनामा कोण देते का देते हे माझ्या दृष्टीने फार त्याला महत्त्व नाही.

तर जिल्ह्याला काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते लाभलेले आहेत ते का गप बसून आहेत याचा आम्हाला उत्तर मिळत नाही असा टोला त्यांनी बाळासाहेब थोरत यांना लगावला आहे.

तर नाना पटोले यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे. या सगळ्या प्रकाराबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते का गप आहेत, त्यांच्यावर अन्याय झाला आहे का असा खोचक सवाल विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केला आहे.

तर ते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत का याचा खुलासा करायला पाहिजे असं अहवान त्यांनी नाना पटोले यांना केला आहे. सत्यजित तांबे यांच्यावर अन्याय झाला म्हणून पक्षाचे तिकीट नाकारले हे काय त्या प्रश्नाचे हे उत्तर नाही असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.