सांगली | 21 ऑक्टोंबर 2023 : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यामध्ये कंत्राटी भरतीवरून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला. पण. त्यांचा हा प्रयत्न आणि बुरखा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाडला. महाविकास आघाडीच्या काळात असा जीसार काढण्यात आला होता. त्यांचे हे पितळ आता उघडे पडले आहे. मांजर कितीही दूध डोळे मिटून पिले तरी ते सर्वांना दिसते असा टोला भाजप आमदाराने महाविकास आघाडीला लगावला. यावेळी त्यांनी शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावरही टीका केली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने प्रयत्न करत आहेत. सरकारने यासंदर्भात प्रवाही बैठक घेतली. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची तयारी सरकार करत आहे. ओबीसीचे सध्या आरक्षण 16% आहे. मराठा समाजाला या ओबीसीच्या 16 टक्केमधून आरक्षण दिलं तर त्या समाजाला काय मिळणार आहे? असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. ते सांगलीत माध्यमांशी संवाद साधत होते.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात कंत्राटी भरतीचा जीआर काढला. शरद पवार यांच्या सल्ल्याने आणि काँग्रेसच्या मदतीने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीने जीआर काढला होता. त्यांचे हे पितळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघड पाडले अशी टीका त्यांनी केली.
महाविकास आघाडीचे सरकार असताना नोकरीबाबत कोणतीही ठोस भूमिका त्यांनी घेतली नाही. यूपीएससी, एमपीएससीच्या परीक्षा घेतल्या नाहीत. अनेक विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात त्यांनी नुकसान केले. आता कंत्राटी भरतीवरून सहानुभूतीचे वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. पण, अशा मोर्चांनी वातावरण तयार होत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
कंत्राटी भरतीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला. शरद पवार आणि त्यांचा नातू विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विष कालवण्याचा प्रयत्न करत होते. अजूनही त्यांचा प्रयत्न सुरूच आहे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करताहेत. मांजर कितीही डोळे मिटून दूध पिले तरी ते सर्वांना दिसत असते. त्याचप्रमाणे शरद पवार आणि त्यांचा नातवाचा हेतू आता पुढे आला आहे. शरद पवार संपूर्ण यांनी महाराष्ट्रात फिरून भुई बडवली. खोटे सांगितले. पण आता त्यांचा हा प्रयत्न उघड्यावर पडला अशी टीकाही आमदार पडळकर यांनी केली.