Manipur Viral Video | ‘मणिपूर सोडा, आधी तुम्ही…’ श्वेता महाले यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

| Updated on: Jul 20, 2023 | 5:54 PM

Manipur Viral Video | भाजपा आमदार श्वेता महाले यांनी इर्शाळगड, मणिपूरमधील व्हायरल व्हिडिओ यावर भाष्य केलं आहे. त्यांनी मणिपूर घटनेवर बोलताना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

Manipur Viral Video | मणिपूर सोडा, आधी तुम्ही... श्वेता महाले यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
Shweta Mahale-aditya thackeray
Follow us on

मुंबई : “राज्यात इर्शाळगड येथे जी दुर्घटना घडली, ती अत्यंत दुर्देवी आहे. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी दाखल झाले आहेत. बचाव कार्य, मदत कार्य जोमाने सुरू आहे. जेवढं होईल तेवढं शासन आपल्या परीने प्रयत्न करेल. लोकांना वाचवण्याच्या आणि अशा दुर्घटना पुन्हा होऊ नये याची देखील दखल सगळ्यांनी घ्यायला हवी असं मला वाटतं” असं भाजपा आमदार श्वेता महाले म्हणाल्या.

मणिपूरमधील व्हायरल झालेल्या व्हिडिओचा त्यांनी निषेध केला. “मणिपूरमधून जे व्हिडिओ समोर आलेत, ते अत्यंत धक्कादायक आहेत. ही किळसवाणी कृती आहे” असं त्या म्हणाल्या.

मणिपूरमधल्या घटनेमुळे देश हादरलाय

“कोणत्याही महिलांबरोबर असं घडू नये. या घटनेचा मी सुद्धा निषेध करते. महिला म्हणून अशा जर घटना घडत असतील, तर महिला सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि पुन्हा घडू नये, यासाठी प्रयत्न होणे सुद्धा तितकच गरजेच आहे” असं श्वेता महाले म्हणाल्या. मणिपूरमधल्या घटनेमुळे देश हादरलाय. दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांना रस्त्यावर फिरवण्यात आलं. त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं.

आदित्य ठाकरेंबद्दल काय म्हणाल्या?

त्यांनी ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “आदित्य ठाकरे यांनी आपल्या पक्षात काय सुरू आहे हे आधी पहावं. मणिपूरमध्ये काय सुरू आहे? यावर बोलण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही. त्यांनी आपले आमदार किती राहिलेले आहेत त्याकडे लक्ष द्यावं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. तिथली सगळी परिस्थिती जाणून घेत आहेत” असं श्वेता महाले यांनी सांगितलं.