BJP Protest on Electricity Bill LIVE | वीज बिलाविरोधात भाजपचं टाळे ठोको आंदोलन, नागपूर, रत्नागिरी, जळगावातील महावितरण कार्यालयाला टाळे

| Updated on: Mar 31, 2021 | 6:48 AM

भाजप वीज बिलाच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या वीज कनेक्शन तोडीविरोधात आज भाजप संपूर्ण राज्यात टाळे ठोको आंदोलन करत आहे.

BJP Protest on Electricity Bill LIVE | वीज बिलाविरोधात भाजपचं टाळे ठोको आंदोलन, नागपूर, रत्नागिरी, जळगावातील महावितरण कार्यालयाला टाळे
Follow us on

मुंबई : भाजप वीज बिलाच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या वीज कनेक्शन तोडीविरोधात आज भाजप संपूर्ण राज्यात टाळे ठोको आंदोलन करत आहे. महाविकास आघाडी सरकारचा 72 लाख कनेक्शन तोडण्याचा निर्णय हा मोगलाई आहे. आधी 100 युनिट माफ करणार असं सांगितलं. लोकप्रिय घोषणा केली खरी पण पुढे काय झाल, फक्त वाहवा मिळवून वीज बिलात माफी देण्याची वेळ आली तेव्हा उर्जामंत्र्यांचा प्रस्ताव उपमुख्यमंत्र्यांनी फेटाळला. ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं त्यांना आधीच काही मिळाल नाही तर मग ही लोक पैसे कसं भरणार. 72 लाखांची वीज कनेक्शन तोडणार असेल तर याचा फटका कोट्यवधी लोकांना बसणार आहे, असं भाजपचं म्हणणं आहे. म्हणून भाजप आज राज्यभर या निर्णयाविरोधात आंदोलन करत आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Feb 2021 03:17 PM (IST)

    महावितरणविरोधात भाजपचं नवी मुंबई टाळे ठोको आणि हल्लाबोल आंदोलन

    महावितरणविरोधात भाजपचं नवी मुंबई टाळे ठोको आणि हल्लाबोल आंदोलन, वाशी MSEB कार्यालयाला ठोकले टाळे, जोरदार घोषणाबाजी करत केले आंदोलन, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली केले अंदोलन

  • 05 Feb 2021 03:15 PM (IST)

    जामनेर येथे भाजपचे वीज बिल माफी संदर्भात आंदोलन

    जामनेर येथे भाजपचे वीज बिल माफी संदर्भात आंदोलन, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने मोर्चा काढून आंदोलन, महावितरण विभागाच्या कार्यलयाला ठोकले टाळे


  • 05 Feb 2021 03:13 PM (IST)

    ठाण्यात भाजपचे वीज बिलाबाबत राज्य सरकारच्या आणि महावितरणच्या विरोधात टाळे ठोको आंदोलन

    ठाण्यात भाजपचे वीज बिलाबाबत राज्य सरकारच्या आणि महावितरणच्या विरोधात टाळे ठोको आंदोलन भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की, टाळा लावताना भाजप नेते आणि पोलिसांमध्ये झाली धक्काबुक्की, आंदोलन करणाऱ्या 50 भाजप कार्यकर्त्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याविरोधात केली घोषणाबाजी, आमदार निरंजन डावखरे,संजय केळकर सह इतर पदाधिकारी मोर्च्या मध्ये सामील

  • 05 Feb 2021 03:13 PM (IST)

    वीजबिल रद्द करण्याचा मागणीसाठी भाजपचे यवतमाळात टाळे ठोको आंदोलन, पोलीस कर्मचाऱ्यांकडून पत्रकाराला मारहाण

    यवतमाळ – वीजबिल रद्द करण्याचा मागणीसाठी भाजपचे  टाळे ठोको आंदोलन, आंदोलन दरम्यान भाजप कार्यकर्ते पोलिसांमध्ये धक्काबुक्की, पोलीस कर्मचाऱ्यांकडून पत्रकाराला मारहाण, पत्रकार सचिन येवले याला पोलिसांनी केली मारहाण

  • 05 Feb 2021 03:11 PM (IST)

    परभणीत वीज वितरण कार्यालयाला भाजपने ठोकले टाळे

    परभणी : परभणीत वीज वितरण कार्यालयाला ठोकले टाळे, महावितरणच्या कारवाई विरोधात भाजपा च्या वतीने करण्यात आले आंदोलन, राज्यसरकार विरोधात करण्यात आली जोरदार घोषणा बाजी

  • 05 Feb 2021 03:10 PM (IST)

    विरारमध्ये भाजपच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर धडक मोर्चा

    विरारमध्ये भाजप च्या वतीने महावितरण कार्यालय समोर धडक मोर्चा काढून सरकार विरोधात निदर्शन करण्यात आली आहेत,  निदर्शन करीत महावितरण कार्यालयाला भाजप कार्यकर्त्यांनी टाळे ही ठोकले आहे, ताळेबंदीच्या काळात सर्व सामान्य माणसाला महावितरण कडून हजारो रुपयाचे विज बिल आकारण्यात आले आहेत

  • 05 Feb 2021 03:06 PM (IST)

    जामनेर येथे भाजपचे वीज बिल माफी संदर्भात आंदोलन

    जळगाव : जामनेर येथे भाजपचे वीज बिल माफी संदर्भात आंदोलन, महावितरण विभागाच्या कार्यलयाला ठोकले टाळे, भाजपचे चिन्ह असलेले टाळे ठोकले महावितरण कार्यलयाला

  • 05 Feb 2021 02:57 PM (IST)

    कर्जत आणि अलिबागमध्ये भाजपाचे महावितरण विरोधात आक्रमक आंदोलन

    रायगड : कर्जत व अलिबाग मध्ये भाजपाचे महावितरण च्या विरोधात आक्रमक आंदोलन, अखेर अलिबाग मध्ये पोलीसानी आंदोलकांनां अडविले तर कर्जत मध्ये पोलीस व महावितरणच्या अधिका-यांनी आंदोलकांचे म्हणणे एकुन विचार करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलक शातं, महावितरणच्या विरोधाज जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपा चे कार्यकर्ते व अधिकारी आक्रमक

  • 05 Feb 2021 12:35 PM (IST)

    सोलापुरात पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट, पोलीस आणि कार्यकर्ते किरकोळ जखमी

    सोलापुरातील आंदोलनात टाळे ठोकताना पोलीस आणि कार्यकर्त्यात झटापट पोलीस आणि कार्यकर्ते किरकोळ जखमी, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सहा ठिकाणीही भेट दिल्या, सुभाष देशमुख यांचे पुत्र आणि भाजपचे नेते महेश देशमुख यांनी विजापूर रोड येथील एमेसिबी कार्यालयासमोर आंदोलन करीत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडत भाजपचा कार्यकर्ता जवळचे कुलूप जप्त केलं

  • 05 Feb 2021 11:33 AM (IST)

    कांदीवलीतही भाजपचा MSEB च्या कार्यालयावर मोर्चा

    कांदीवलीत भाजपचं वीज बिल दरवाढीविरोधात आंदोलन, भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी, मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखलं

  • 05 Feb 2021 11:31 AM (IST)

    कोल्हापुरात भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात 

    कोल्हापुरात आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट, पोलिसांनी बळाचा चुकीचा वापर केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप, भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

  • 05 Feb 2021 11:30 AM (IST)

    कोल्हापुरात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट

    वीज बिलाप्रकरणी भाजपचं टाळे ठोको आंदोलन, कोल्हापुरात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट, आम्ही महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं, तेव्हा पोलिसांनी बळाचा चुकीचा वापर केला, काही पोलिसांनी शीवीगाळही केला, याचा आम्ही निषेध करतो, हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला

  • 05 Feb 2021 11:26 AM (IST)

    जिल्हाध्यक्षा नगर सेविका ॲड. स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत भाजपचं आंदोलन

    सांगली – 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आज भाजपने आंदोलन केले आहे, असा केला आरोप, भाजपा महिला मोर्चा सांगली, जिल्हाध्यक्षा नगर सेविका ॲड. स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केले आंदोलन.

  • 05 Feb 2021 11:24 AM (IST)

    सांगलीतील हिराबाग काॅर्नरच्या MSEB कार्यालयाला भाजपने टाळे ठोकले

    सांगली – महावितरणा विरोधात भाजपाने केले टाळा ठोको आणि हल्लाबोल आंदोलन, सांगली तील हिराबाग काॅर्नर येथील MSEB कार्यालयाच्या गेट ला ठोकले टाळे, जोरदार घोषणाबाजी करत केले आंदोलन.

     

  • 05 Feb 2021 09:58 AM (IST)

    ऊर्जामंत्री असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी बनवलेल्या कार्यालयाला आज त्यांनी कुलुप लावलं

    ऊर्जामंत्री असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी बनवलेल्या कार्यालयाला आज त्यांनी कुलुप लावलं, ‘ हे दुर्दव्य आहे, जनतेच्या हितासाठी मी आज या कार्यालयाला लॅाक करतोय’, सरकार वीज बिल माफ करेपर्यंत भाजप शांत बसणार नाही, आज तालुका स्तरावरील महावितरण कार्यालयाला लॅाक केलंय, भविष्यात जिल्हा कार्यालयाबाहेर आंदोलन करणार, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

  • 05 Feb 2021 09:51 AM (IST)

    माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात कोराडीत आंदोलन

    वीज कनेक्शन तोडणी विरोधात भाजपचं आंदोलन, थोड्याच वेळात भाजपच्या आंदोलनाला होणार सुरुवात, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन,  कोराडी येथील वीज वितरण कंपणीच्या कार्यालय परिसरात होणार आंदोलन, नागपुरात भाजपचं आज सहा ठिकाणी आंदोलन, भाजप आमदार कृष्णा खोपडे, समिती मेघे, मोहन मते करणार आंदोलन