बीड : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यांनतर भाजपने हा मुद्दा लावून धरला आहे. भाजपने राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी नेतृत्व आणि बंजारा समाजातील उच्चपदस्थ मंत्री संजय राठोड यांना संपविण्याचे भाजपकडून कटकारस्थान केल्याचा आरोप होतोय भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून होतोय. याच नाराजीमुळे भाजपच्या सदस्य तसेच बीडमधील काळवंटी तांडा गावाच्या सरपंच असलेल्या कमल चव्हाण (Kamal Chavana) यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. (bjp sarpanch Kamal Chavana in beed district given resignation of bjp Membership)
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे. या प्रकरणात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये वनमंत्री संजय राठोड यांचे नाव असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे राठोड यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी भाजपने केली आहे. तसेच, राजीनामाच नाही, तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे. भाजपच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राज्यातील काही घटकाने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. भाजपच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी उघडपणे जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. संजय राठोड यांच्या समर्थनार्थ बीडमधील काळवंटी तांडा गावच्या भाजप संरपंचानी आपल्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. यावेळी त्यांनी आपल्या राजीनाम्यात भाजपकडून ओबीसी आणि बंजारा समाजाचे नेतृत्व संपवण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप केला आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राठोड यांच्या राजीनाम्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे पुण्यात दाखल झाले असून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची माहिती घेणार असल्याचं कळतंय.
इतर बातम्या :
राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही, आता तातडीने गुन्हा दाखल व्हावा: निलेश राणे
पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री संवेदनशील; केवळ आरोपावरून कारवाई करणं चुकीचं: दीपक केसरकर
Pooja Chavhan case : पुणे पोलिसांचे पथक यवतमाळमध्ये दाखल, रुग्णालयातील उपचाराबाबत तपास होणार
(bjp sarpanch Kamal Chavana in beed district given resignation of bjp Membership)