एकनाथ शिंदेना जेलमध्ये टाकायचा भाजपचा प्लान, तुरूंगात जायला लागू नये म्हणून ते रडले – संजय राऊतांचा गौप्यस्फोट

| Updated on: Apr 22, 2024 | 11:02 AM

ईडी आणि सीबीआय मागे लावून भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंना तुरुंगात टाकणार होतं, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. तुरूंगात जायच नाही म्हणून ते ( एकनाथ शिंदे) कुठे-कुठे जाऊन रडले, त्यांनाच विचारा ना. स्वत: एकनाथ शिंदे तुरूंगाला घाबरून पळाले, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

एकनाथ शिंदेना जेलमध्ये टाकायचा भाजपचा प्लान, तुरूंगात जायला लागू नये म्हणून ते रडले - संजय राऊतांचा गौप्यस्फोट
sanjay raut
Follow us on

ईडी आणि सीबीआय मागे लावून भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंना तुरुंगात टाकणार होतं, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. तुरूंगात जायच नाही म्हणून ते ( एकनाथ शिंदे) कुठे-कुठे जाऊन रडले, त्यांनाच विचारा ना. स्वत: एकनाथ शिंदे तुरूंगाला घाबरून पळाले, असा दावाही संजय राऊत यांनी केला. भाजपमध्ये एकतर भ्रष्टाचाऱ्यांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना जागा आहे. एखादा माणूस भाजपमध्ये गेला की, त्याला खोटं बोलण्याचं ट्रेनिंग दिलं जातं, असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडलं.

भाजपच्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा डाव होता, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत केला. त्या मुद्यावरून शिवसेना नेते ( उबाठा गट) आणि खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट करत एकनाथ शिंदे आणि भाजपावर आरोप केले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

“जून 2022 मध्ये सरकार कोसळण्याआधी महाविकास आघाडीने भाजपाचे आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याच कारस्थान रचलं होतं. भाजपाच्या काही आमदारांना फोडण्याच महाविकास आघाडीच प्लानिंग होतं” असं एकनाथ शिंदे म्हणाले होते.

त्यांच्या या विधानाचा समाचार घेत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली. भाजपाने एकनाथ शिंदे यांनाच जेलमध्ये टाकायचा प्लान केला होता. तेव्हा तुरूंगात जायला लागू नये म्हणून ते ( शिंदे) कुठे-कुठे जाऊन रडले, हे तुम्ही त्यांना विचारा. भाजपमध्ये गेल्यावर त्या व्यक्तीला खोटं बोलण्याचं ट्रेनिंग दिलं जातं, असे टीकास्त्र राऊत यांनी सोडले.

नमो.. नमो.. चालतं पण हर हर महादेव, जय भवानी का चालत नाही ?

ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी प्रचारगीतात जय भवानी शब्द तरी का आणावा ? असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. त्यांच्या या प्रश्नावर प्रतिक्रिया देत संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. नमो नमो चालतं पण हर हर महादेव, जय भवानी चालत नाही ? असा सवाल राऊत यांनी विचारला.

दिल्लीमधील निर्वाचन आयोग जे आहे, त्याचं नाव बदलून भाजप निर्वाचन आयोग केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जय भवानी हा शब्द किंवा हर हर महादेव या घोषणा पिढ्यानपिढ्या दिल्या जातात. त्यावर आत्तापर्यंत कोणीही बंदी आणली नव्हती, काँग्रेसच्या राज्यातही असं कधी घडलं नव्हतं. तुमचं घर घर मोदी चालतं, पण हर हर महादेव , जय भवानी चालत नाही. तुमचं नमो-ढमो चालतं पण हिंदू धर्मातील एक शब्द चालंत नाही. कसलं तुमचं सरकार, बकवास हिंदुत्वावादी सरकार.. अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं. तुमचं व्यापारी हिंदुत्व, नकली हिंदुत्व आहे अशी टीका करत तुम्ही हिंदुत्वाचे काय दिवे लावलेत ? असा खोचक सवालही राऊत यांनी फडणवीसांना विचारला.

काय आहे प्रकरण  ?

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची निशाणी पण गेली. त्यांना धनुष्यबाण सोडून मशाल हाती घ्यावी लागली.  मशाल गीतावरुन निवडणूक आयोगाने त्यांना कोंडीत पकडले. मशाल गीतातील जय भवानी शब्द आणि इतर काही शब्दांवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला. त्यावर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला थेट आव्हान दिले. कारवाई करायची तर करा,  पण आम्ही जय भवानी हा शब्द काढणार नाही. भवानी माता आमची अस्मिता आहे. अस्मितेशी तडजोड नाही, असा दमच त्यांनी भरला. त्यामुळे वातावरण तापलं आहे.

आम्ही जय भवानी हा शब्द काढणार नाही. आमच्यावर कारवाई करणार असाल तर त्यांनी आधी मोदी आणि शहा यांच्यावर कारवाई करावी. मग महाराष्ट्राच्या कुलदैवताची अपमान केला असा आरोप आम्ही केला तर त्याला तुमच्यावर उत्तर आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला.

राज्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्राबद्दलचा आकस ठासून भरला आहे. पण महाराष्ट्रातील कुलदैवतांबाबतचा आकस असेल याची आम्हाला कल्पना नव्हती. तुम्ही कितीही ठरवलं तरी जतना बघून घेईल. ही महाराष्ट्राची घोषणा आहे. आज जय भवानी शब्द काढायला सांगितलं, उद्या जय शिवाजी हा शब्द काढायला सांगाल. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी आयोगाला ठणकावले.