फडणवीसांना मिळालेल्या नोटिशीनंतर भाजप आक्रमक, प्रत्येक जिल्ह्यात नोटीशीची होळी करणार, चंद्रकांतदादांची घोषणा

| Updated on: Mar 12, 2022 | 8:09 PM

फडणवीसांना (Devendra Fadnavis) पोलिसांनी जबबा नोंदवण्यासाठी बोलावलं होतं, मात्र नंतर पोलीस घरी जाऊन जबाब घेणार असल्याची माहिती देण्यात आली. याचवरून आता भाजप आक्रमक झाली आहे.

फडणवीसांना मिळालेल्या नोटिशीनंतर भाजप आक्रमक, प्रत्येक जिल्ह्यात नोटीशीची होळी करणार, चंद्रकांतदादांची घोषणा
चंद्रकांत पाटलांची आक्रम भूमिका
Image Credit source: Tv9
Follow us on

मुंबई : राज्यात सध्या फोन टॅपिंग प्रकरण (Phone Tapping) गाजत आहे. याप्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर गुन्हा झाला आहे. तर फडणवीसांना (Devendra Fadnavis) पोलिसांनी जबबा नोंदवण्यासाठी बोलावलं होतं, मात्र नंतर पोलीस घरी जाऊन जबाब घेणार असल्याची माहिती देण्यात आली. याचवरून आता भाजप आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करत नाही. तर त्याऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बजावली याचा आपण तीव्र निषेध करतो. या प्रकरणात संपूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी असून उद्या रविवारी प्रत्येक जिल्ह्यात भाजपाचे कार्यकर्ते नोटिशीची होळी करून निषेध नोंदवतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांना सांगितले.

सरकारची वाटचाल विनाशाकडे

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आघाडी सरकारच्या मंत्र्यांची भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर पडत आहेत. एका मागोमाग एक मंत्री तुरुंगात जात आहेत. त्यांचा पापाचा घडा भरत आहे. यामुळे आघाडीचे नेते घाबरून गेले आहेत. परिणामी त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना अडविण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. महाविकास आघाडीची वाटचाल विनाशाकडे होत आहे. त्यांनी सांगितले की देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्षनेत्याला माहिती मिळविण्याचा विशेषाधिकार असतो. त्यांना माहिती कोठून मिळाली असे विचारता येत नाही. तरीही या सरकारने बेकायदेशीर रितीने त्यांना नोटीस पाठवली. हे सरकार वारंवार कायदा धाब्यावर बसवून काम करत आहे. परिणामी त्यांना अनेकदा न्यायालयाकडून थपडा खाव्या लागल्या आहेत. अनिल देशमुख, सचिन वाझे, भाजपाच्या बारा आमदारांचे निलंबन अशा अनेक प्रकरणात या सरकारला न्यायालयाचे फटके बसले आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

भाजपचा आक्रमक पवित्रा

ते म्हणाले की, बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर त्याची तपशीलवार माहिती असलेला पेन ड्राईव्ह मा. देवेंद्र फडणवीस यांनी त्याच दिवशी केंद्रीय गृहसचिवांकडे तपासासाठी सादर केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. अशा रितीने मा. देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करून हा तपास रोखता येणार नाही. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे. असा इशारा त्यांनी दिला आहे. भाजपने आज बीकेसीतही मोर्चाचे प्लॅनिंग केले होते.

‘ना फ्लॉवर है, ना बटर है, फक्त बटरफ्लाय है’, पुष्पातील डायलॉगच्या आधारे नितेश राणेंचा उदय सामंतांवर निशाणा

Kolhapur Assembly ByElection : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, कधी होणार मतदान?

‘आरोप सिद्ध झाल्याशिवाय नवाब मलिकांचा राजीनामा नाही’, जयंत पाटील यांचा पुनरुच्चार, भाजपवर निशाणा