रायगड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोरलई येथे जमीन घोटाळा (korlai land scam) केल्याचा आरोप करत भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. भाजपतर्फे ठाकरे यांच्या विरोधात आज (बुधवारी) अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सहभागी होतील. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमण्याची शक्यता आहे. तशी माहिती त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. (bjp will protest against the CM Uddhav Thackeray korlai land scam)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपने यापूर्वी अनेक गंभीर आरोप केले आहेत. विशेषत: भाजप नेते किरीट सोमय्या हे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसतात. त्यांनी उद्धव ठाकरे यांनी कोरलई येथील 10 कोटी किमतीच्या जमिनीची माहिती दडवल्याचा गंभीर आरोप केला आहे. ठाकरे यांनी निवडकणूक शपथपत्रात दिलेली माहिती आणि कोरलई येथील कागदपत्रांची पडताळणी केल्यावर ही बाब समोर आल्याचे त्यांनी म्हटलंय. सोमय्या यांनी याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यापूर्वीच तक्रार केलेली आहे.
याच आरोपामुळे भाजप आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयामोर लाक्षणिक धरणे आंदोलन करणार आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता भाजपचे हे आंदोलन असेल.
दरम्यान, यापूर्वी सोमय्या यांचे पूत्र नील सोमय्या यांची एका जुन्या वादाविषयी पोलिसांनी चौकशी केली होती. मुलुंडच्या पोलिस उपायुक्तांनी ही चौकशी केली होती. नील सोमय्या हे भाजपचे नगरसेवक आहेत. सध्या ज्या प्रकरणात नील सोमय्या यांची चौकशी झाली, ते प्रकरण बरंच जुनं आहे. मात्र, काल पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात आली होती. आता पुढील काळात पोलीस नील सोमय्या यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागलं आहे.
केवळ हिमालयाच्या गुहेत ध्यानधारणा करुन चालणार नाही…., सामना अग्रलेखातून मोदींवर टीकाhttps://t.co/D4ricMGeO5#SaamanaEditorial #Modi #UttarakhandDisaster #Chamoli
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 10, 2021
संबधित बातम्या :
शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळण्याला 100 टक्के केंद्र सरकार जबाबदार, भुजबळांचा घणाघात
औरंगाबादेत भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट, नेमकं घडलं काय?
कांजूरमार्ग जमीन वाद – राऊत म्हणतात, मोठं षडयंत्र!
(bjp will protest against the CM Uddhav Thackeray korlai land scam)