गुणरत्न सदावर्ते यांच्या अंगावर कुणी शाई फेकली ? सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा Video

| Updated on: Nov 26, 2022 | 3:19 PM

संविधान दिनी मी संविधनावर बोलत असतांना माझ्या अंगावर शाई फेक झाली आहे ? माझ्या हातात शिवाजी महाराजांची प्रतिमा होती त्यावरही शाई फेकल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्या अंगावर कुणी शाई फेकली ? सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा Video
Image Credit source: Google
Follow us on

सोलापूर : गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा झाला आहे. गुणरत्न सदावर्ते हे राज्यातील विविध भागात जाऊन ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यासह कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांना विरोध देखील होत आहे. उस्मानाबाद येथेही सदावर्ते यांना विरोध झालेला होता. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते हे सोलापूर दौऱ्यावर होते. पत्रकार परिषद सुरू असतांना सदावर्ते यांच्या अंगावर काळी शाई फेकण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सदावर्ते बोलत असतांना संभाजी ब्रिगेडच्या वतिने काळी शाई फेकण्यात आली आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेतच मोठा राडा झाल्याचे बघायला मिळाले आहे. शरद पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात संवाद यात्रा सळो की पळो करून सोडत असल्याने त्यांची पिलावळ मला विरोध करत असल्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हंटले आहे.

गुणरत्न सदावर्ते यांची महाराष्ट्रात संवाद यात्रा सुरू आहे, सोलापूर दौऱ्यावर असतांना गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदे राडा झाला आहे.

संभाजी ब्रिगेड यांनी शाई फेकली आहे, मात्र त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे मी जी नावे घेतली आहे, त्याचा सहभाग आहे असा आरोप देखील गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

संविधान दिनी मी संविधनावर बोलत असतांना माझ्या अंगावर शाई फेक झाली आहे ? माझ्या हातात शिवाजी महाराजांची प्रतिमा होती त्यावरही शाई फेकल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.

माझ्यावर शाई फेकी मागे शरद पवार, अजित पवार आणि उद्धव ठाकरे हे असून त्यांच्या तोंडात बोळा गेला आहे का ? ते बोलता ही पिलावळ सोडून काय करतात स्वतः पुढे असे आवाहन देखील सदावर्ते यांनी केलं आहे.

मी संविधानाची भाषा बोलतो म्हणून मला टार्गेट केले आहे, शरद पवारांच्या पराभवाचे लक्षण असल्याचे देखील सदवार्ते म्हणाले आहे. यामध्ये पोलीसांनी कारवाई करावी त्यांच्या डोळ्यासमोर हे घडल्याचे देखील ते म्हणाले आहे.

याशिवाय दोन आठवड्यापूर्वी नक्षलवादी लोकांची मला नोटिस आली असल्याचे सांगत मारून टाकू खून करून टाकू असेही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हंटले आहे.