मुंबई : पोलिसांसाठी वरळी पोलीस कॅम्पात 100 बेड्सचं कोव्हिड सेंटर उभं केले जाणार (Covid center made in Worli) आहे. हे सेंटर खास पोलिसांसाठी उभं केले जात आहे. यामध्ये आयसोलेशन सेंटरही तयार केले जात आहे. कोरोनाग्रस्त पोलिसांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकार आणि पालिकेने हा निर्णय घेतला (Covid center made in Worli) आहे.
वरळी कॅम्पातील ज्या जागेवर हे रुग्णालय उभे केले जाणार आहे. त्या जागेची पाहणी स्थानिक नगरसेवक आशिष चेंबुरकर यांनी केली. कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे अशा कोरोनाग्रस्त पोलिसांवर या कोव्हिड रुग्णालयात उपचार केले जाणार आहे.
वरळी विभागात मोठ्या प्रमाणात पोलीस वसाहत आहे. या वसाहतीमध्येही आतापर्यंत अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त पोलिसांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 2211 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या सहा दिवसात चारेशहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
तारीख – एका दिवसात लागण झालेले पोलीस
28 मे – 131
27 मे – 75
26 मे – 80
25 मे – 51
24 मे – 87
एका दिवसात 73 पोलीस बरे होऊन घरी परतले आहेत, ही त्यात दिलासादायक बाब. 83 अधिकारी आणि 887 पोलीस कर्मचारी असे एकूण 970 जण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत.
संबंधित बातम्या :
कोरोनाग्रस्त पोलिसांसाठी वरळीत उभारणार 100 बेड्सचे कोव्हिड सेंटर
एकाच दिवसात 116 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, सहा दिवसात चारशेहून अधिक पोलिसांना लागण
राज्यातील पोलीस कोरोनाच्या विळख्यात, पोलिसांच्या दक्षतेसाठी गृह विभागाकडून नियमावली जारी