माजी आमदाराच्या लेकींनी खेळाचं मैदान मारलं! सुवर्ण पदकाची कमाई करणाऱ्या लेकी कोण ?

| Updated on: Feb 21, 2023 | 2:22 PM

वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप 2023 या स्पर्धेत देविशा आणि तनिष्का यांनीही सहभाग घेतला होता. धनुर्विद्या स्पर्धेत दोघींनी चमकदार कामगिरी केली आहे. दोघींनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.

माजी आमदाराच्या लेकींनी खेळाचं मैदान मारलं! सुवर्ण पदकाची कमाई करणाऱ्या लेकी कोण ?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : राजकीय घराण्यातील मुलांचा कल नेहमीच राजकारणात येण्याचा असतो. पण काही ठिकाणी अपवाद असतात. त्यांची मुलं वेगळी वाट धरतात. शालेय जीवनातच त्यांना वेगळया क्षेत्राची गोड निर्माण होत असते. अशीच काहीशी गोडी माजी आमदार पंकज भुजबळ ( Ex MLA Pankaj Bhujbal ) यांच्या मुलींना लागली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या धनुर्विद्या स्पर्धेत ( international archery competition ) सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही मुलींनी ही कामगिरी केली आहे. त्यांनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिल्याने त्यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या त्या नाती आहेत.

देविशा भुजबळ आणि तनिष्का भुजबळ या दोन्ही मुंबईतील भुजबळ नॉलेज सिटी एमईटी येथे शिक्षण घेत आहे. इंग्लंड येथे आयोजित केंट शहरात आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. इंटरनॅशनल फिल्ड असोसिएशनने त्याचे आयोजन केले होते.

वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप 2023 या स्पर्धेत देविशा आणि तनिष्का यांनीही सहभाग घेतला होता. धनुर्विद्या स्पर्धेत दोघींनी चमकदार कामगिरी केली आहे. दोघींनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.

हे सुद्धा वाचा

माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या त्या दोन्ही कन्या असून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या त्या नाती असल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. त्यांच्यावर शालेय वर्तुळातून देखील अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत 38 देशांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये 568 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये भारताकडून एकूण 12 खेळाडू विविध स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. त्यात पंकज भुजबळ यांच्या दोन्ही मुलींचा समावेश होता.

इंग्लंड येथील मेडवे पार्क स्पोर्ट्स सेंटर गिलिंगहॅम, केंट येथे या स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. 13 ते 18 फेब्रुवारी या काळात ही स्पर्धा भरविण्यात आली होती. धनुष्य प्रकारात जवळपास भारताचे 12 खेळाडू यामध्ये सहभागी होते.

देविशा पंकज भुजबळ हिने 19 वर्षाच्या गटात सहभाग घेतला होता. त्यात कम्पाऊंड बो गटात सुवर्णपदक मिळविले आहे. तर तनिष्का पंकज भुजबळ हिने 17 वर्षाखालील कम्पाऊंड बो गटात सुवर्ण पदक मिळविले आहे.

पंकज भुजबळ यांच्या दोन्ही मुलींनी चमकदार कामगिरी करत भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. या दोन्ही मुली फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून सहभाग घेतला होता.

धनुर्विद्या स्पर्धेचे उद्घाटन केंट च्या महापौर जेन अल्डोस आणि टॉनी अल्डोस यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. यावेळी आंतरराष्ट्रीय फील्ड आर्चरीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.