बुलडाणा : कोरोना रुणांच्या वाढत्या संख्येमुळे संपूर्ण राज्यामध्ये आरोग्य प्रशासन अलर्टवर आहे. विदर्भातील यवतमाळ, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झालेय. तर बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या संपूर्ण परिस्थितीत ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत; त्या कोव्हिड सेंटर्सची दुरवस्था झाली आहे. कोव्हिड सेंटर्समध्ये प्रचंड अस्वच्छता झाली आहे. येथे वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात येत असून यामध्ये बॉटल्स इंजक्शन्स, सलाईन यांना उघड्यावर टाकण्यात येत आहे. या प्रकारामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. (buldana condition of the covid centers is deteriorating)
बुलडाणा शहरातल्या अपंग निवासी शाळेत कोविड सेंटर असून याठिकाणी दररोज शेकडो कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र, या सेंटरमध्ये जिकडेतिकडे अस्वच्छता पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढलाय. वैद्यकीय कचरासुद्धा रुग्णालयातच पसरलेला आहे. या सर्व प्रकारामुळे या कोव्हिड सेंटरची परिस्थीत अतिशय विदारक झाली आहे. तशी व्यथा येथील कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी मांडली.
कोरोना रुग्ण वाढल्यामुळे बुलडाणा शहरातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश येथील प्रशासनाने दिले आहेत. या आदेशानुसार आजचा आठवडी बाजार बंद होता. बाजारातील सर्व दुकाने, भाजी मंडई, पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती.
मागील 5 दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आलेख वाढतो आहे. 15 फेब्रुवारी रोजी 129 कोरोनाग्रस्त आढळले होते. तर 17 फेब्रुवारी रोजी हाच आकडा 199 वर पोहोचला होता. 19 फेब्रुवारी रोजी कोरोनाग्रस्तांचा आकडा 200 च्या पुढे गेला होता. या दिवशी 270 जणांना कोरोना झाल्याचे आढळले होते. 20 फेब्रुावारी रोजी 215 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे.
लग्न समारंभावर निर्बंध
दरम्यान, कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर पवित्रा घेतला आहे.कोरोना नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यासंबंधीचे आदेश प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
कोलकाता पोलिसांचा खळबळजनक दावा, भाजप नेत्या पामेला गोस्वामी यांना ड्रग्ज घेण्याची सवयhttps://t.co/jKkTPcHq9D#PamelaGoswami | #Pamela | #bjp | #Kolkata
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 21, 2021
इतर बातम्या :
… तर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागेल; छगन भुजबळांचा इशारा
एकाच व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोना होण्याचे चान्सेस आहेत का?; वाचा स्पेशल रिपोर्ट
Rajesh Tope on Local | लोकल ट्रेनची वेळ वाढवण्याबाबत अजूनही चर्चा सुरु: राजेश टोपे
(buldana condition of the covid centers is deteriorating)