वडिलांचं कॅन्सरने निधन, जिद्दी मुलाचं MPSC तून अधिकारी होण्याचं स्वप्न, मात्र गणेशला नियतीने गाठलं!

| Updated on: Mar 16, 2021 | 12:24 PM

गणेश केशव बेंडमाळी (Ganesh Kesav Bendmali) असं या 30 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. तो सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा इथला रहिवासी होता.

वडिलांचं कॅन्सरने निधन, जिद्दी मुलाचं MPSC तून अधिकारी होण्याचं स्वप्न, मात्र गणेशला नियतीने गाठलं!
Ganesh Bendmali Buldhana MPSC student
Follow us on

बुलडाणा : स्पर्धा परीक्षेची (MPSC Exam) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. गणेश केशव बेंडमाळी (Ganesh Kesav Bendmali) असं या 30 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. तो सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा इथला रहिवासी होता. गणेश हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत होता. एक वर्षापासून परीक्षाच न झाल्याने तो ताणतणावाखाली होता, असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. (Buldhana MPSC student Ganesh Bendmali dies due to massive heart attack)

गेल्या वर्षापासून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तारखा निश्चित होत नव्हत्या. नुकत्याच परीक्षेच्या तारखा जाहीर होऊन ती रद्द झाल्याने पुण्यात विद्यार्थ्यांचा उद्रेक झाल्याचं राज्याने पाहिलं. त्यातच आता गणेशच्या मृत्यूने विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती अधोरेखित होत आहे.

गणेश हा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी बनण्याची सुंदर स्वप्ने पाहात होता. गणेश अल्पभूधारक असून त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाकिची आहे. त्याच्या वडिलांचा दोन वर्षांपूर्वीच कँसरने मृत्यू झाला होता. त्यामुळे अधिकारी होऊन कुटुंबाचा आधार होण्याचं स्वप्न गणेशचं होतं.

मात्र परीक्षा होत नसल्याने तो तणावाखाली होता. 14 मार्च रोजी रात्री 11 वाजता अचानक छातीत दुखू लागल्याने त्याला तातडीने चिखली येथे उपचारासाठी दाखल केलं. मात्र मध्येच त्याची प्राणज्योत मालवली. गणेशच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे.

एमपीएससी पूर्व परीक्षा 21 मार्चला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षेची (MPSC exam) नवी तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता ही परीक्षा 14 मार्चऐवजी 21 मार्चला म्हणजे रविवारी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी 14 मार्च रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती. MPSC ची परीक्षा पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे संवाद साधून नव्या तारखेची घोषणा केली होती.

संबंधित बातम्या 

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापौरांची मोठी घोषणा 

MPSC Exam 2021 New Date : नवी तारीख जाहीर, आता 21 मार्चला MPSC परीक्षा!

(Buldhana MPSC student Ganesh Bendmali dies due to massive heart attack)