बुलढाणा : नेहमीच वादग्रस्त विधानाममुळे आमदार संजय गायकवाड हे चर्चेत येत असतात. मागे पेन्शनच्या संदर्भात कर्मचारी संपावर गेले असतांना आमदार संजय गायकवाड यांनी संपकरी कर्मचाऱ्यावर जहरी टीका केली होती. याबाबत सोशल मिडियासह संपूर्ण राज्यात पेन्शनच्या मुद्द्यावरून संप करत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. यावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय गायकवाड यांना इशारा दिला आहे. संजय गायकवाड यांचे ते विधान त्यांचे वैयक्तिक मत होते. त्या मताशी आम्ही कुणीही सहमत नाही. मात्र, आमदार संजय गायकवाड यांनी यापुढे संयम ठेवून बोलले पाहिजे, त्यांना प्रसिद्ध मिळू शकते पण अधिकाऱ्यांना नाउमेद करू नये अशा शब्दांत विखे पाटील यांनी सल्ला दिला आहे.
भाजपचे नेते तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे बुलढाणा दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यान त्यांनी आमदार संजय गायकवाड यांना सल्ला दिला आहे. यामध्ये संजय गायकवाड यांना विखे पाटील यांनी इशारा दिला आहे.
आमदार महोदय यांना अधिकाऱ्यांवर बोलून प्रसिद्धी मिळू शकते पण अधिकाऱ्यांना नाउमेद करू नये, पुढील काळात त्यांनी संयम ठेवून बोललं पाहिजे असा सल्लाच राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आठवडाभरापूर्वी जुन्या पेन्शनच्या संदर्भात आंदोलन सुरू असतांना एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामध्ये संजय गायकवाड यांनी पेन्शनचा संप करणाऱ्यांवर जहरी टीका केली होती.
गायकवाड यांनी पगारावरुण भाष्य करत पेन्शन मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली होती. त्यामध्ये पेन्शनची मागणी करणाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. त्यांचा निषेध केला जात होता. त्यामुळे संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली जात होती.
आमदार संजय गायकवाड यांच्या अनेकदा क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यामध्ये वादग्रस्त विधान आणि शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संजय गायकवाड हे वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतांना राधाकृष्ण विखे पाटलांनी चांगलाच टोला लगावला आहे.
दरम्यान, यावेळी बोलत असतांना महसूलच्या नोंदीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे. काही महिण्यात नवीन नोंद करणारी यंत्रणा सुरू होणार आहे. त्यामुळे बनावट दस्त नोंदणी थांबली जाणार आहे.
स्टॅम्पवेंडरकडे सुद्धा नवी यंत्रणा असणार आहे त्यामुळे बनावट दस्ताला आळा बसेल, आणि काही महसूल अधिकारी यामध्ये दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हंटलं आहे.