बुलढाणा: शेगांवातील लोकांच्या टकलावर केस उगवायला सुरुवात, पण आता एक नवीन समस्या सुरु..

| Updated on: Jan 29, 2025 | 3:46 PM

बुलढाणा येथील काही गांवामध्ये रहिवाशांना अचानक टक्कल व्हायरसची बाधा झाली आहे. त्यामुळे अनेकांचे संसार अडचणीत आले आहेत. तर लग्नाळू लोकांना कोणी मुलगी पसंद करीत नसल्याच्या घटना घडल्या आहेत.परंतू आता लोकांच्या टक्कलावर केस उगवत आहेत.मात्र, आता एक नवीनच समस्या पुढे आली आहे.

बुलढाणा: शेगांवातील लोकांच्या टकलावर केस उगवायला सुरुवात, पण आता एक नवीन समस्या सुरु..
Follow us on

बुलढाणा येथील शेगांव गावातील अनेक लोकांना अचानक केसगळती सुरु झाल्याच्या बातम्यांनी देशभर टक्कल व्हायरसची चर्चा सुरु झाली होती. या अचानक सुरु झालेल्या केसगळती मागचे कारण अद्याप कोणालाही समजले नाही. या गावातील लोकांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचे नमूने तपासण्यात आले. तरुणांचे किंवा म्हाताऱ्यांचे सर्वांचे केस गळू लागल्याने या गावातील लोकांची समस्या राष्ट्रीय समस्या ठरली.या लोकांना फंगल इन्फेक्शन देखील झालेले नाही असा दावा डॉक्टरांनी केला. आयसीएमआरच्या पथकाने गावात येऊन तपासणी केली आहे. आयसीएमआरचा अहवाल काही आलेला नाही. परंतू या गावातील लोकांच्या डोक्यावर आता एका औषधाने केस उगवले आहेत. परंतू आता त्यांना नवीन समस्या सुरु झाली आहे.

बुलढाणा येथील बोंडगाव, कालवड, हिंगणा अशा ११ गावात अक्षरश:  ‘टक्कल व्हायरस’ पसरलाआहे असा दावा केला जात आहे. या आजाराला गावातील पाणी जबाबदार असल्याचे म्हटले जात होते. गावातील पाण्याचे अनेक नमूने तपासणीसाठी नेण्यात आले आहेत. परंतू पाण्यात फारसा काही दोष आढळला नसल्याचे म्हटले जात आहे. काही गावातील पाण्यात क्षार जास्त असले तरी इतर अनेक गावात असे पाणी आहे परंतू तेथील लोकांचे असे केस गळत नाहीत असाही दावा केला आहे. लोकांना आधी डोक्यात खाज येते, त्यानंतर खाजवण्यास गेले असता थेट केसच हातात येतात. त्यामुळे गावातील तरुणांच्या लग्नाचे देखील वांदे झाले आहेत. या गावातील तरुणांना कोणी मुलगी तयार होत नसल्याचे देखील उघडकीस आले आहे.

हे सुद्धा वाचा

आता नवीनच समस्या सुरु

केसगळतीने हैराण झालेल्या गावकऱ्यांना आता आयुर्वेदामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. येथील डोक्यवार केस उगवलेल्या नागरिकांना टक्कल पडण्यापासून दिलासा मिळत आहे. भारतीय आयुर्वेद अनुसंधान संस्थानने असा दावा केला आहे. आयुर्वेदाच्या औषधाने टक्कल पडलेल्यांना केस यायला सुरुवात झाली आहे. मात्र केस आल्यावर केस पुन्हा जात असल्याचे नागरिक म्हणत आहेत. आता तर आता नवीनच समस्या निर्माण झाली आहे. ज्यांना टक्कल पडले होते. त्यांना आता डोळ्यांचा त्रास सुरू झाला आहे. तर काहींची नजर कमजोर होत असल्याचा आरोप होत आहे. या समस्येवर तात्काळ निदान शोधण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.