Navaneeth Rana : अमरावती मतदार संघात लोकसभा निवडणूक 2024 अत्यंत चुरुशीची होणार आहे. भाजपने येथून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महायुतीतील अनेक जण नाराज झाले आहे. बच्चू कडू यांनी पहिल्यांदा दंड थोपाटले तर महायुतीमधील या नेत्याने पण नवनीत राणा यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तारीख आता अगदी जवळ आलेली असताना राणा यांच्यासमोरील अडचणी वाढत असल्याचे चित्र आहे.
राजकारण सोडेल, प्रचाराला जाणार नाही
महायुतीतील नेते आणि माजी खासदार आनंदराळ अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेतले. बुलडाणा दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राजकारण सोडेने पण राणा यांच्या प्रचाराला जाणार नसल्याचे निर्धार त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवला. महायुतीसाठी वातावरण चांगले आहे. कोणी काहीही म्हणो महायुतीला 45 च्या वर जागा मिळतील पण 35 च्या वर मिळायला हरकत नाही. देशात 400 पार शक्यता कमी, पण 300 पार नक्की जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राणा यांच्यावर जहरी टीका