बुलढाणा : समाजात अनेक परंपरा आहेत. काही वाईट तर काही चांगल्या. वाईट काय आणि चांगल्या काय हे प्रत्येकजण आपआपल्या मताने ठरवत असतो. चिखली येथेही एक परंपरा आहे. ही परंपरा गेल्या साडेतीनशे वर्षांपासून जपले जाते. भाविकांना या परंपरेमुळे फायदा होतो. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे ते अशा परंपरा कायम ठेवतात. त्यापैकी ही एक परंपरा. मुलं झालं की ते वगदीला लटकवले जाते. याचा अर्थ संबंधित देवीचे आशीर्वाद घेतले जातात.
साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली चिखली येथील रेणुका मातेची यात्रा महोत्सवाला सुरुवात झालीय. यात्रेनिमित्त मातेच्या वगदीला नवसाची लहान मुले लटकवण्याची परंपरा आहे. भाविकांचा अशी मनोकामना आहे की, जर महिलेला मुल झाले तर ते झाल्यानंतर वगदीला लटकवले जाते.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली हे रेणुका मातेचे जागृत देवस्थान आहे. मातेचा यात्रा महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे रेणुका मातेची शोभायात्रा काढण्यात येते. मातेच्या दर्शनासाठी परिसरातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी येतात. या यात्रेचे महत्वाचे आकर्षण आहे ते ३ ५ ० वर्षांची परंपरा असलेली पारंपरिक पद्धतीची लाकडाची वगदी. यात्रेच्या दिवशी सकाळी रेणुका मातेची बहीण असलेली ग्राम शेलूद येथून ही वगदी काढण्यात येते.
भाविकांचा असा समज आहे की, जर कुणाला मुल-बाळ होत नसेल तर त्या महिलेने मातेला नवस करायचा. जर मला मुल झाले तर हे लहान मुल तुझ्या वगदीला ५ वर्षे किंवा ७ वर्षी, १ ० वर्षे, २ ० वर्षे लावीन. मुलाचे आई-वडील हे देवीला नवस करतात. तो फेडण्यासाठी आपल्या मुलाला वगदीला लटकावून मातेची साडी चोळी देवून ओटी सुद्धा भरतात. त्यानंतर तो नवस पूर्ण होतो असा समज परिसरातील भाविकांचा आहे.
(टीप – टीव्ही ९ मराठी या गोष्टींना दुजोरा देत नाही. फक्त परंपरा काय आहे हे माहितीच्या आधारे दिलेले आहे)