सैलानी बाबाच्या दर्ग्यावर चालले होते भाविक, वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटले अन्…

| Updated on: Jun 01, 2023 | 3:19 PM

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबांच्या दर्ग्यावर दर्शनासाठी जालना येथील भाविक चालले होते. पण दर्ग्यापर्यंत पोहचूच शकले नाहीत.

सैलानी बाबाच्या दर्ग्यावर चालले होते भाविक, वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटले अन्...
सैलानी बाबांच्या दर्ग्यावर चालेलेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात
Image Credit source: TV9
Follow us on

संदिप वानखेडे, TV9 मराठी, बुलढाणा : हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले सैलानी बाबांच्या दर्गाहवर नवसासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा बुलडाणा तालुक्यातील ढासाळवाडी जवळच्या वळणावर अपघात झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वाहन पलटी होऊन हा अपघात झाला. या अपघातात जवळपास 20 भाविक जखमी झाले असून, त्यांच्यावर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालना जिल्ह्यातील काठोरा बाजार येथील हे सर्व भाविक असून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला आणि बालकांचा समावेश आहे. जखमींना ढासाळवाडी येथील नागरिक तसेच पोलीस प्रशासनाने तात्काळ रुग्णालयात हलवले.

दर्ग्यात नवसासाठी जात असतात अपघात

बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हाजी हजरत अब्दुल रहेमान सैलानी बाबांच्या दर्गाह आहे. या दर्ग्याची ख्याती प्रसिद्ध आहे. यामुळे नेहमीच संपूर्ण देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. नवस करण्यासाठी येत असतात. जालना जिल्ह्यातील काठोरा येथील 20 भाविक खाजगी वाहनाने या दर्ग्यात दर्शनासाठी चालले होते. मात्र दर्शनाच्या ठिकाणी पोहचण्याआधीच सर्व भाविकांवर रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली.

दर्ग्याच्या ठिकाणी जात असताना बुलढाणा तालुक्यातील ढासाळवाडीजवळ वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटले. यात वाहनातील 20 भाविक जखमी झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा