Buldana | खामगाव वाहतूक पोलिसांवर खड्डे बुजविण्याची वेळ, राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बनले डोकेदुखी!

| Updated on: Jul 18, 2022 | 9:20 AM

पावसामुळे खामगावातील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतूककोंडीसोबतच अपघाताच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झालीयं. हे सर्व टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनीच खड्डे बुजवले. खामगांवच्या वाहतूक पोलिसांनी हातात फावडे घेऊन खामगाव- नांदुरा रोड वरील खड्डे बुजविले.

Buldana | खामगाव वाहतूक पोलिसांवर खड्डे बुजविण्याची वेळ, राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बनले डोकेदुखी!
Image Credit source: tv9
Follow us on

बुलडाणा : पावसाळा (Rainy season) सुरू झाला की, रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर होतो. खामगावात जागोजागी खड्डे पडून वाहतूककोंडी (Traffic jam) निर्माण होते आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी आता थेट वाहतूक पोलिसच मैदानात उतरल्याचे चित्र खामगावात बघायला मिळाले. खामगावातील वाहतूक पोलिसांचा एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरलायं. या फोटोमध्ये वाहतूक कोंडी आणि अपघात (Accident) टाळण्यासाठी तीन वाहतूक पोलिस स्वत: रस्त्यावरील खड्डे बुजवताना दिसत आहेत.

खामगावच्या वाहतूक पोलिसांच्या हातात फावडे

पावसामुळे खामगावातील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतूक कोंडीसोबतच अपघाताच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झालीयं. हे सर्व टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनीच खड्डे बुजवले. खामगांवच्या वाहतूक पोलिसांनी हातात फावडे घेऊन खामगाव- नांदुरा रोड वरील खड्डे बुजविले. त्यांच्या या खड्डे बुजविण्याच्या उपक्रमाचे नागरिकांकडून काैतुक केले जातंय.

हे सुद्धा वाचा

वाहतूक पोलिसांच्या फोटोची चर्चा सुरू

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव- नांदुरा रोड वरील एमआयडीसी टर्निंग रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. परिणामी या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. नांदुराकडून येणाऱ्या तसेच खामगावकडून नांदुराकडे जाणाऱ्या वाहनांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी मोठे पडले आहेत. बांधकाम विभागाने हे खड्डे भरणे आवश्यक होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना खड्ड्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतोयं